=====================
दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी आम आदमी पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल यांचा वाढदिवस होता या दिवशी आम आदमी पार्टी भद्रावतीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आम आदमी पार्टी भद्रावती च्या वतीने प्रेरणा अंध व अपंग निवासी शाळा लोणार या शाळेत जाऊन फळ व चॉकलेट वाटप करण्यात आले त्यावेळी लहान मुलांना संबोधित करताना तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकार यांनी केजरीवालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आम्ही असेच सामाजिक कार्य पार्टीच्या वतीने करत राहू अशी ग्वाही दिली. शहराध्यक्ष सुरज शहा यांनी सुद्धा लहान मुलांना संबोधित करत असताना एक प्रश्न विचारला की कोणी अरविंद केजरीवालांना ओळखता काय ? तर तिथला एका दहा वर्षीय मुलाने सांगितले की “हो ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी तिथल्या सरकारी शाळांमध्ये खूप चांगलं काम केलं असं मी ऐकलेलं आहे” त्यावेळी सुरज भाऊ शहा यांनी म्हटलं की दिल्लीचे काम आता घरोघरी पोहोचून राहिलेले आहेत तुम्हीही सुद्धा अभ्यास करून मोठे होऊन केजरीवाल साहेब यांच्यासारखे कार्य करावे अशी मी आशा व्यक्त करतो आहे. त्यानंतर गजानन महाराज मतिमंद विद्यालय भद्रावती येथे जाऊन मतिमंद मुलांच्या हातून केक कापण्यात आले व त्यांचे तोंड गोड करण्यात आले लहान मुलांचे एकमेकांवर प्रेम बघून सर्व कार्यकर्त्यांचे मन भरून आले होते.
========================
लहान मुलांशी गप्पागोष्टी करत तिथे पार्टी तर्फे स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम करत सर्वांसोबत मिळून स्नेहभोजनाच्या स्वाद लहान मुलांसोबत घेण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सचिव विजय सपकाळ, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचिव सचिन पाटील, तालुका उपाध्यक्ष विनित निमसरकार, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, मंगेश भाऊ खंडाळे, अतुल भैसारे, केशवभाऊ पचारे, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, विनोद भाऊ लांडगे, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===≈====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793