* डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली परंतु त्यांच्या विचारांची हत्या कधीच होऊ शकत नाही रवींद्र तिराणिक *

0
23

________________________

डॉ. नरेंद्र दाभोळकरांना अभिवादन.
—————————————-
चंद्रपूर- भद्रावती(दि 20 ऑगस्ट).

समाजात सुरू असलेल्या शोषण विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गेली तीस दशकापासून सातत्याने लढा उभारणारे पद्मश्री डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला दहा वर्षे पूर्ण झालेत. दहा वर्षानंतरही आरोपीवर कारवाई होऊ न शकल्याने ‘दहा वर्षे खुणाची कार्यरत विवेकी असंतोषाची” खदखदत असलेली कार्यकर्त्यांची भावना कधी मूक मोर्चातून तर कधी धिक्कार फलक प्रदर्शनातून सातत्याने राज्यभर सुरू आहे. सरकार आणि तपास यंत्रणाच्या प्रक्रियेवरच एकूण प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून कोणत्या विचारसरणीच्या लोकांनी केला हे सर्वांनाच माहित आहे. तरीही त्यांना अटक का केली जात नाही आहे .तपास यंत्रणा कडून संदिग्धता का ठेवली जाते , असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र अंनिस मार्गदर्शक- सल्लागार ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक यांनी उपस्थित केला आहे. माणूस मारता येतो, पण विचार नाही ‘डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हा एक विवेक वादी विचार आहे” तो कधीच मारता येत नाही, संपवताही येत नाही व त्यांची हत्या ही करता येत नाही असे स्पष्ट अध्यक्षीय संवादपर मनोगत रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले .डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री साई आयटीआय (सेमिनार हॉल) भद्रावती येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते . प्रमुख अतिथी म्हणून अंनिस तालुकाध्यक्ष डॉ .राहुल साळवे, मुनेश्वर गौरकार, सचिव प्रा, अमोल ठाकरे,
कार्याध्यक्ष शारदाताई खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करीत मार्गदर्शन पर विचार व्यक्त करीत अभिवादन केले.
अभिवादन व्यक्त करीत असताना येणारी आव्हाने पेलवण्यासाठी युवा पिढीने सक्षम असण्याची गरज आहे असे मत अभियांत्रिकी क्षेत्रातील दीक्षा खोब्रागडे , अशोक जवादे, सुमेध खोब्रागडे, रवींद्र वानखेडे ,मनोज मोडक, श्रीधर भगत, अनिता भजभुजे, मुक्ताताई पेटकर यांनी मांडले. प्रसंगी सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून प्रा.नामदेव रामटेके यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रचंड कार्याची सविस्तर भूमिका विशद केली.
महाराष्ट्रातील संत समाजसुधारकांचा वारसा पुढे नेणारी भारतीय संविधानानुसार वाटचाल करणारी आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी कार्य करणारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांच्याहुन अधिक काळ संघटिरित्या अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी या समितीची स्थापना केली. सुरुवातीला मुठभर कार्यकर्त्यांच्या सोबत सुरू झालेले हे काम आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारले आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घुण खुनानंतर देखील अत्यंत निर्धाराने हे काम दशकभर चालू आहे.
महाराष्ट्रातला प्रगतशील विचारांचा वारसा आहे. इथली संत परंपरा आणि समाजसुधारक यांनी चालू केलेले कृतिशील समाज प्रबोधनाचे काम समिती आपल्या ताकदीने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक प्रगती झाली दिसत असली, तरी अजूनही समाजमनावर ‘अंधश्रद्धेचा” पगडा टिकून राहिलेला दिसतो. केवळ तेवढेच नाही, तर विज्ञानाचे नाव वापरून त्या माध्यमातून अंधश्रद्धांचा प्रसार केला जाताना देखील दिसून येतो आहे. या सगळ्यामुळे समाज व्यवस्था तुम्हाला अस्वस्थ झालेली वाटत असेल, हे चित्र बदलावे असे वाटत असेल. तर खऱ्या अर्थाने प्रवाहाच्या विरोधात उभे राहून युवा पिढीने या विचाराची कास धरून पुढे येणे गरजेचे आहे .हा विचार याप्रसंगी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अभिवादन कार्यक्रमातून सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.

____________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

_____________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here