======================
*चंद्रपूर* :- चंद्रपूर येथील गेल्या काही दिवसापासून पावसामुळे रस्त्यावर खड्डे झाले आहे. मात्र रस्त्यावरील खड्डयाकडे दुर्लक्ष होत आहे.शहरात गणरायाचे आगमन लवकरच होणार असून यापूर्वी खड्याची दुरुस्ती करावी. तसेच
===========================
चंद्रपूर शहर मोठ्या संख्येने
भावी भक्त विसर्जनाचे पाहण्याकरिता शहरात येतात अनंत चतुर्थीच्या अगोदर शहरातील पावसामुळे झालेल्या खड्ड्याच्या लवकर बुजवण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी एका पत्रकाद्वारे मनपा आयुक्त यांना केली आहे. यापूर्वी देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन गणेशोत्सव गणेश विसर्जन यादरम्यान होणारा व्यवस्थेत संदर्भात आवश्यकता सूचना केल्या होत्या परंतु या आठ दिवसात शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे काही रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे ते तातडीने बुजवण्यात यावे अशी विनंती मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांच्याकडे चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी चर्चेदरम्यान केली आहे .गणेश भक्तांची मिरवणुकी दरम्यान कोणताही त्रास होऊ नये याकरिता रस्त्यावर पडलेले खड्डे हे लवकरात लवकर बुजवण्यात यावे मिरवणुकी व गणेश विसर्जन प्रेमींना कोणत्याही प्रकारच्या त्रासदायक प्रवास होणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणून याकरिता मनपा आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793