====================
बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2023 – गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2023 पासून आम आदमी पक्षातर्फे सुरू झालेली झाडू यात्रा आज बल्लारपूर शहरातही पोहोचली. विदर्भातील सर्वसामान्य जनतेला पक्षाच्या धोरणाशी जोडण्यासाठी तसेच आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी संपूर्ण विदर्भात हि झाडू यात्रा काढण्यात आली. शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात ढोल ताश्यांच्या गजरात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे, महाराष्ट्र संघठन सचिव भूषण ढाकुलकर, संदीप देसाई, मोडक जी, मयूर दौंडकर इत्यादी महाराष्ट्र समिती चे पदाधिकारी या यात्रेत उपस्थित होते. सकाळी 9.30 वाजता कला मंदीर चौकातून झाडूयात्रा निघाली त्यानंर कादरिया मस्जीद चौक मध्ये पहुंण्याचे स्वागत करून पक्षाच्या टेकडी विभाग कार्यालयात पाहुण्यांचे आगमन झाले व तेथे सुद्धा पहुंयाचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर वैशाली चौक, हनुमान मंदिर चौक, बस्ती विभागातील काटा गेट चौक, सातनल चौक व महात्मा गांधी प्रतिमेस माल्यार्पण करून वस्ती विभागातिल महिलानी पहुण्याचे स्वागत केले व यात्रा प्रस्थान करून नगरपरिषद चौकात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तसेच छ.शिवाजी महारांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली. यानंतर प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी यांनी शहरात पक्षाच्या कार्याची प्रशंसा केली व अश्याच पद्धतीने संवैधानिक मार्गाने पक्षाचा विस्तार करण्यास सांगितले. शेवटी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार व प्रा. नागेश्वर गंडलेवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले यावेळेस पक्षाचे बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, राजुरा तालुक्यातील पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793