=======================
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये नव तरुणाने दिलेला संदेश युवा पिढीतील तरुणांना दिशादर्शक
—————————————
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात अंतरगाव या ग्रामस्थळी परिसरात पाच एकरात ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करून रेमंड अशा नामांकित कंपनीत अभियंता या पदावर असताना कोरोनाच्या कालावधीत गावात आलेल्या रोहित महाडोळे एका नवतरुण होतकरू तरुणाची शेतीकडे लागलेली ओढ मातीशी जोडलेली नाळ जी जोडल्या गेली ती तुटली नाही .रेमंड कंपनीच्या कंपनीच्या अभियंता या जॉबला बाय-बाय करीत शेतीत जुळला गेल्या दोन वर्षात शेतीविषयक पूरक व्यवसाय मच्छी पालन, हिरवे भाजीपाला, बदलत्या ऋतुमानानुसार पिके, व पांढरा सोनं असलेल्या कापूस याकडे वळला व स्वतः मेहनतीच्या जोरावर शेतात राबत विविध उत्पादन करीत पाच एकरात पाच ते सात लाखाची उत्पादन करीत दिशादर्शक रोजगार निर्माण करीत बेरोजगारी क्षेत्रात स्वतःला बेरोजगार म्हणणाऱ्या नवीन संदेश दिला तो खरोखरच दिशादर्शक व इतरांना प्रेरणादायी आहे. सामाजिक कार्यकर्ते नागपूर जनमंच सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, सोशल मीडिया सदस्य समीर आसुटकर, निखिल धोंगडे आदींनी टीम सहित यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यात अंतरगाव ग्रामस्थ ठिकाणी रोहित महाडोळे या तरुणाच्या शेतात भेट घेऊन संवाद साधत अनेक शेती विषयक उपक्रमाची माहिती जाणून घेत रोहितच्या कृतिशील कार्याची प्रशंसा करीत दखल पात्र नोंद घेतली.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793