=======================
बल्लारपूर शहर
===============
चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.गेल्या महिनाभरात अनेक घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.त्याचवेळी गुरूनानक महाविद्यालयासमोरील गौरक्षण वार्डातील रहिवासी सौ. शीतल ताई मुकेश झाडे या आपल्या वडिलांच्या निधनामुळे राहत्या घराला कुलूप लावून चंद्रपूरला गेल्या होत्या.तारीख:- 18/09/2023 कुटुंब घरी परतताच त्यांना पाच ते सहा लाख रुपये किमतीचे सोने चोरी झाले असल्याचे समजले, कुलूप तोडून चोरी केली, पोलिस तक्रारही दाखल झाली,पुन्हा 08/10/2023 रोजी त्यांच्या घरात चोरी झाली,बाहेर ठेवलेला कुलर व काही भंगार वस्तू चोरीला गेल्या,त्याबाबतही तक्रार दाखल करण्यात आली,तरीही पोलीस प्रशासनाला चोरट्यांचा मार्ग काढता आलेला नाही.
====≈===================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793