====================
*वर्धा*
=======================
येथे झालेल्या नागपूर विभागीय स्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात लोक शिक्षण संस्था, वरोडा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय ने चंद्रपूर जिल्हाचे प्रतिनिधित्व करताना नागपूर मनपा संघाचा 25-10 25-14 असा सरळ दोन डावात पराभव केला व नागपूर विभागीय स्पर्धेचे अजिंक्यपद कायम राखले. सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय सदर स्पर्धेकरिता पात्र ठरला आहे.
विजयी संघात प्रगती कायरकर, राधा कडू, फाल्गुनी कासावार, पूर्वा घानोडे, कस्तुरी नागेकर, अतिशा सपाटे, प्रणोती पेटकर, फाल्गुनी पवार व ऋतुजा वैरागडे यांचा समावेश होता.
लोकशिक्षण संस्थेने गेली 50 वर्षांपासून व्हॉलीबॉल खेळात नेत्रदिपक कामगिरी करीत खेळातील वर्चस्व कायम राखले आहे.
======================
लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांतजी पाटील , उपाध्यक्ष श्रीकृष्णजी घड्याळपाटील, कार्यवाह प्रा. विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत देशपांडे, सदस्य मंगेश मल्हार, मुख्याध्यापक श्री राहुल राखे, उपमुख्याध्यापक दिपक नवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, वरोरा गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चहारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, संदीप उईके, यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
=======================
सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक श्री सुनील बांगडे, अनिल घुबडे, गणेश मुसळे,प्रशिक्षक निखिल बोबडे, प्रणाली मेश्राम, दुशांत लांडगे, प्रा. उत्तम देऊळकर, पालक तसेच लोकशिक्षण संस्था वरोडा यांना दिले आहे
विजयी संघांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
विशेष प्रतिनिधि :- विनोद येमलाल शर्मा । वरोरा 9422168069।