====================
सीसीटीव्ही चे आधारे चोरांचा शोध लावण्यास पोलीस यशस्वी
=====================
अवघ्या 12 तासात गुन्हा उघड
===========≈===
*वरोरा*
====================
तालुक्यातील टेमुर्डा येथील महाराष्ट्र बँक चे अज्ञात चोरट्यांनी ए टी एम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे व सायरनचे वायर कापून एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला.अशी तक्रार बँक शाखा प्रबंधक वरोरा पोलीस स्टेशन ला दिली.सदर घटना 20 ऑक्टोम्बर 2023 ला रात्रौ 2.45 ते 3.15 चे दरम्यान घडली.पोलिसांनी कलम 379,511 भादवी गुन्हा नोंद केला आहे.
वरोरा पोलिसांना गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठले .घटनास्थळावरील व विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले.यामध्ये चारचाकी टवेरा वाहन क्र. एम एच 31 इ के 4214 असा क्रमांक प्राप्त झाल्याचे सदर वाहनावरून मनीष अमर पाल रा.रेवना ता.जी.घाटमपूर(उत्तर प्रदेश) हं.मुं.अवधूत नगर माणेवाडा नागपूर यास ताब्यात घेऊन त्याचे कडे सखोल चौकशी केली असता सदर टवेरा वाहनाने नागपूरवरून तो व त्याचा नातेवाईक नामे अंकित उर्फ कुलदीप अरविंद पाल वय 20 वर्ष रा.अल्टा महेशगंज ता.मोराव जिल्हा-अलाहाबाद(उत्तरप्रदेश)असे दोघे मिळून सदर गुन्हा कबूल केल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले टवेरा वाहन ,मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण 7,20.000 रु.चा माल हस्तगत करण्यात आला आला. आरोपी क्र.1)मनीष अमर पाल ह्याला पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे कौशल्यपूर्ण तपास करून20 ऑक्टोम्बर 2023 ला अटक केली.आरोपी क्र.2)अंकित उर्फ कुलदीप अरविंद पाल वय 20 वर्ष हा फरार आहे.त्याचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी ,अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु ,सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपानी ,पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,पो.स्टेशन वरोरा यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोउपनी दीपक ठाकरे,किशोर मित्तरवार,पोहवा दीपक दुधे,दिलीप सूर,नापोह अमोल धंदरे,किशोर बोढे,पोअ दिनेश मेश्राम,संदीप मुळे, सूरज मेश्राम,फुलचंद लोधी,ह्यांनी अथक परिश्रम घेऊन अवघ्या 12 तासात गुन्हा उघड केला.
====================
वरोरा पोलीस स्टेशन कडून आवाहन
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता जास्तीत जास्त जनतेनी त्यांचे कार्यालयात तसेच राहते घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावे, जेणेकरून पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यास मदत होईल.
=====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
विशेष प्रतिनिधि :- विनोद येमलाल शर्मा । वरोरा 9422168069।
====≈==============
संपादक :- शशी ठक्कर 9881277793