*तेलगूवारी फाऊंडेशन तर्फे बतुकम्मा उत्सव उत्साहात साजरा*

0
38

================≈=======

     *बल्लारपूर* 

===================
22/10/2023 रविवार
दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील शहरातील तेलगूवारी फाऊंडेशन तर्फे तेलगू भाषिकांचा बतुकम्मा उत्सव साजरा करण्यात आला. बतुकम्मा उत्सव म्हणजे तेलगू भाषिकांद्वारे साजरा केला जाणारा पुष्पोत्सव, हळदीने गौरीदेवी बनवून निसर्गातील विविध फुले आणतात. फुलांचा गोपूर बनवून पारंपरिक लोकगीते म्हणतात. शहरात तेलगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तेलगू संस्कृती जपण्याचा प्रयत्न तेलगूवारी फाऊंडेशन च्या वतीने केला जात आहे. या उत्सवा प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रमुख तेलगू भाषिक डाॅक्टरांना व गणमान्य व्यकतींना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये डाॅ किसन बानोत, डाॅ. सुनिल कुल्दिवार, डाॅ रमेश यामसानिवार , डाॅ रमा राव,डाॅ श्रीनिवास तोटा, व्यंकटेश बालबैरय्या, सौ. एस विजया या पाहुण्यांचा समावेश होता. विविध पुरस्कारांचे वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात तेलगूवारी फाऊंडेशन के अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार , उपाध्यक्ष आनंद महाकाली, सचिव प्रा. नागेश्वर गंडलेवार, कोषाध्यक्ष उमेश कोलावार ,संघठनमंत्री सतिश नंदाराम, सहसचिव सतिश तंगडपल्लीवार, संजय मुप्पीडवार ,रमेश कावेटी, गणेश सिलगमवार, श्रीनिवास उनावा, रोहित जंगमवार, श्रीनिवास तोटावार, सुधीर कालापल्ली, गणेश पुलगमवार, सतीश बोनकुरी, महेश जंजर्लावार, सतीश नारायणदास, विलास कोंडावार, रमेश नातरगी, वनिता पुप्पलवार, मल्लेश्वरी महेशकर, राजेश चंद्रगिरी ,प्रकाश नरसिंगोज, राजु बक्कावार, शंकर दुब्बावार श्रीनिवास कलवला, गणेश गुम्मलवार, तिरूपती गोडगुलवार ,अरूण गाजरेड्डीवार या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here