*लोकप्रतिनिधी जनसेवक नेते नवरात्र उत्सव व दांडियात मग्न जनतेच्या ज्वलंत मूळ प्रश्नाला बगल व तीलांजली*

0
23

========≈=============

लोकप्रतिनिधी व उत्सव प्रिय जनता
—————————————-
चला उत्सव प्रिय नेत्यांना, जनसेवकांना लोकप्रतिनिधींना साथ देऊया ,
हातात हात देऊया!
—————————————-
औद्योगिक क्षेत्रातील रॉयल्टी व कोट्यवधीचे उत्सव साजरे करण्यासाठी लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेऊन नाचूया! खांद्यावर झेंडे घेऊया! धाब्यावरती जाऊया! मोठमोठे बॅनर लावूया! जाहिराती छापूया प्रसिद्धी मिळवून घेऊया! जनतेला मूळ प्रश्नापासून बगल देत
निवडून आणूया!
—————————————-
सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली अजूनही कर्ज माफी नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व कंपन्या असताना स्थानिक
बेरोजगारांच्या हातांना रोजगार नाही.
परिणामी चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी पुत्रांचे मोठ्या प्रमाणात वाढते आत्महत्या सत्र सुरू असून कधी थांबेल का?
मृत्यू झाल्यानंतर तोंडाला पाने पुसणारी तुटपुंजी मदत देऊन प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवत प्रसार होणार नेते जिल्ह्यात मुळात आत्महत्याच होऊ नये यासाठी ठोस पावले उचलतील का?

=======================

सोयाबीन पीक करपले त्या शेतकऱ्यांचे विम्याचे अजून पैसे मिळाले नाही.
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन हजारो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई नाही. जनतेच्या
विज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ. 200 युनिट ची वीज माफी हवेतच विरली.
जल, जंगल, जमीन यात वाढते गैर अतिक्रमण, सर्वसामान्य मानव व वन्य प्राणी संघर्ष यात कधी प्राणी तर मानव शेवटी मृत्यू ठरलेलाच याबाबत काही ठोस पावलेउचललीत का? याबाबत लोकप्रतिनिधी विचार मंथन करताना दिसत आहेत का? शहरी वर्गाबरोबरच
खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी ,मागासवर्गीय व शेतकरी यांची हुशार मुले रोजगारासाठी वन वन भटकत आहेत. गावात अभ्यासिका नाहीत त्याकरिता लोकप्रतिनिधी जनसेवक यांची मानसिकता नाही .यावर खर्च करायला पैसे नाहीत . विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रवाहात आणून कलागुणांना चालना देण्याकरता लोकप्रतिनिधी स्वयं स्फूर्ती ने पुढाकार घेत मदत करायला तयार नाहीत अशी अवस्था आहे. उत्सव प्रिय लोकप्रिय प्रतिनिधींनी एकेक गावे जरी दत्तक घेतली तरी खऱ्या अर्थाने किमान गावातील काही प्रश्न सुटतील परंतु ती मानसिकता नाही. सामाजिक कार्य करणाऱ्या एनजीओ केवळ औपचारिक ठरत आहेत. राजकारण्यांच्या भवताली पिंगा घालताना दिसतात. दररोज प्रत्येक दिवसाला एक पुरस्कार व सन्मान मिळवून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे . पुरस्कारकर्त्यांचे समाजासाठी ग्रामीण जीवनातील तळागाळातील लोकांसाठी प्रत्यक्षात कुठले योगदान आहे. विचार मंथन करण्याची गरज आहे.

===============

विचार मंथन
रवींद्र तिराणिक
९८२२७२८९४० 

===================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here