===================
*विशाल निंबाळकर*
======================
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बऱ्याच मूलभूत सोयींपासून वंचित राहावे लागत आहे ही बाब लक्षात येताच भाजपाचं एक शिष्टमंडळ रुग्णालयात पाहणी करण्याकरिता गेलं असता हे निदर्शनास आलं की तिथे अस्वच्छता देखील पसरलेली होती तसेच काही औषधींचा तुटवडा देखील दिसून आला. ज्यामुळे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना औषधांसाठी बाहेरील औषधालयामध्ये धावा घ्यावा लागत होता. याचा काही पर्याय काढता यावा आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये या हेतूने भाजपाच्या या शिष्टमंडळाने पुढाकार घेऊन या सगळ्या बाबींचे निराकरण केले तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांना औषधांच्या तुटवड्याबाबत निवेदन देखील देण्यात आले. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देताना भारतीय जनता पक्षाचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष यश बांगडे, मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडावर, भाजयूमो सचिव सतीश तायडे, मुग्धा खांडे, जयश्री आत्राम, राहुल काळे,बिमल शहा उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793