====≠===================
शेतकऱ्यांचा आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख असलेल्या विदर्भातील शेतमजूर कन्यांनी
पंतप्रधान मोदींची घेतली होती भेट
—————————————-
संसद भवनात कामकाज पाहण्याकरता दाखल झालेल्या मुलींचे पंतप्रधानांनी केले होते कौतुक
—————————————
“बेटी बचाव -बेटी पढाव” चा मुलींनी दिला होता काव्यरूपी संदेश
—————————————-
भारत तिब्बत मैत्र संघाच्या राज्य अधिवेशनात खुशीचा सहभाग
—————————————-
महाराष्ट्रातील विदर्भात यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्व श्रुत प्रचलित परिचित आहे . याच जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील काही प्रमाणात वनराई झुडपी जंगल असलेलं आदिवासी प्रभागात मोडणारं “नांझा” नामक सतराशे ते अठराशे लोकसंख्या वस्ती असलेला गाव .त्यातही मुलांची संख्या अधिक तर मुलींची संख्या कमी येथील खुशी हिवरकर नावाची( चुटकी) मुलगी घरची अत्यंत गंभीर परिस्थिती वडील शेतमजूर कधी कामाला जाणे तर कधी घरी बसणे तर आई गाव गाव चुटूक- मुटूक कपडे विकण्याचे काम करते ..घरात लहान भाऊ असा परिवार आईला मुलींना खूप शिकवायचं मोठं करायचं हे स्वप्न उरासी बाळगून सातत्याने कष्ट करीत असलेली आई ,त्यातच खुशीला शिक्षणाची प्रचंड आवड व उरासी जिद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले विचारांचा पगडा शालेय जिल्हा परिषद शाळेतून मिळालेली प्रेरणा खुशीसाठी समर्पक ठरली. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करीत सन २०१४ ला चौथीपर्यंतच प्रायमरी शिक्षण पूर्ण करीत पुढील शिक्षणासाठी खुशीने नांझा गाव मागे सोडले.
घरची परिस्थिती बेताची पुढील शिक्षण कसं घ्यायचं हा प्रश्न तिच्या समोर उभा, परंतु हिम्मत आणि धैर्य व चिकाटी व शिक्षण घेण्याची जिद्द त्याकरिता प्रयत्नांची केलेली पराकाष्टा ….शिक्षण घेण्याकरता विविध ठिकाणावरून माहिती घेत थेट नागपूर येथील वसुंधरा वस्तीगृह गाठलं तिथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. उत्तम वक्तृत्व ,वाद परिसंवाद चर्चासत्र याची आवड असल्याने विविध कार्यक्रमात सहभाग दर्शविला .याच दरम्यान पाचवी सहावीत शिकत असताना २०१५ मध्ये नागपूरच्या वसुंधरा वस्तीगृहातील मैत्रिणी- मुलींना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसद भवनात भेटण्याची संधी मिळाली. हा दिवस वस्तीगृहातील शिकणाऱ्या आई-वडिलांचे पालकत्व हरवलेल्या मुलींसाठी खूप मोठा दिवस होता. देशाच्या पंतप्रधानाशी संवाद साधण्यास मिळाल्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता… खुशी म्हणाली माझ्यासाठी तो खूप मोठा दिवस होता. याच दरम्यान “बेटी बचाव बेटी पढाव” हा काव्यरूपी संदेश लहान मुलींच्या तोंडून विचारातून माननीय पंतप्रधानांनी शांतपणे ऐकून घेतला. भारत देशाच्या पंतप्रधानांनी अर्धा तास विद्यार्थ्यांसमवेत घालवत सर्व वस्तीगृहातील मुलींचे तोंड भरून कौतुक केले.
वसुंधरा गर्ल्स होस्टेलच्या २७ मुली दोन दिवसाच्या दिल्ली भेटीवर गेल्या होत्या. यातील तेरा मुली ईशान्य भारतातील होत्या .चार मुली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील होत्या तर चार मुलींना वडील नव्हते, नागपुरातील विविध शाळेत शिक्षण घेत असलेल्या या निराधार मुलींना आधारवड म्हणून ठरलेल्या वसुंधरा गर्ल्स होस्टेलच्या वैशाली नगर स्थित नागपूरच्या माध्यमातून दिल्लीवारी झाली यादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शहा, खा.पूनम महाजन यांनी महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थिनीचे कौतुक केले. महाराष्ट्र वस्तीगृहातील मुलींनसोबत दान पारोमीताचे कार्याध्यक्ष अविनाश संघवई, उपाध्यक्ष विनया फडणवीस, सचिव नागेश पाटील हे तिघेही मुलींसोबत दिल्लीला गेले होते. परंतु तत्कालीन सुरक्षा विषयक कारणामुळे राष्ट्रपती भवन व संसद भवन येथील कामकाज पाहता आले नाही. तत्कालीन वसुंधरा वस्तीगृहात शिकणाऱ्या मैत्रिणी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करीत आता वेगवेगळ्या शहरात विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहेत . यापैकीच परिस्थिती अभावी मायगृही जिल्ह्यात परतलेल्या यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयातील (बीएससी द्वितीय वर्षाला) शिक्षण घेत असलेली (चुटकी) खुशी हिवरकर हिच्याशी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कलाअकादमीचे संचालक रवींद्र तिराणिक यांनी मनमोकळेपणे संवाद साधत खुशीला बोलते केले. उंचीने लहान परंतु विचाराने प्रचंड उत्साह पूर्ण असलेली खुशी बाबासाहेबांचे विचार, उंच भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचे ऊर्जा स्पिरीट मनात ठेवून वाटचाल करीत आहे. दिनांक १० डिसेंबर२०२३ ला भारत तिब्बत मैत्री संघ महाराष्ट्र अधिवेशनात बदलापूर (पश्चिम )ठाणे मुंबई येथे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या अधिवेशनात “भारत तिब्बत सबंध व भारत की तिब्बत नीती”, “तिब्बत की आजादी व भारत की सुरक्षा”, भारत तिब्बत मैत्री संघ: विस्तार व उपायोजना या तीनही विषयावरील चर्चासत्रात शेतमजूर कष्ट करणाऱ्या आईची मुलगी खुशी हिवरकर “शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई” ……. हा विचार मनाशी बाळगून सहभाग दर्शवणार असून आपलं मत प्रदर्शित करणार आहे. कुठलेही आर्थिक पाठबळ कुटुंबाच्या पाठीशी नसताना पुढील शिक्षण घेत उंच शिखरावर वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या तमाम मुलींना सर्व सहकार्यांशी बळ देण्याची गरज आहे .हे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठीच नव्हे! तर तमाम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असेल.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793