श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त निघालेल्‍या शोभायात्रेचे भाजपातर्फे भव्‍य स्‍वागत.

0
24

=====================

संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन भक्‍ती मार्गाला समर्पित होते : राहुल पावडे
=====================
चंद्रपूर:- श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमीत्‍त समाजातर्फे चंद्रपूरात काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रेचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 8 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गिरनार चौक येथे संत शिरोमणी जगनाडे महाराज संताजी यांच्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत आलेल्या सर्व समाज बांधवांना लोकनेते विकास पुरुष ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे फ्रुटी वाटप करण्यात आले.श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी यावेळी परिसर निदावून गेला होता. चंद्रपूर भाजप महानगर अध्यक्ष राहूल पावडे, महानगर यांनी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी रामपाल सिंग शिला चव्हाण चंद्रकला सोयाम विठ्ठल डुकरे कल्पना बगुकर शितल आत्राम अजय सरकार महेंद्र जुमडे प्रदिप किरमे वंदना तिखे कल्पना जांभुळकर दिनकर सोमलकर सचिन कोत्पल्लीवार संदिप आगलावे रवी चहारे बाळू कोलनकर मुग्धा खांडे प्रलय सरकार चंदन पाल संदीप देशपांडे किरण बुटले आकाश ठूसे संदीप सदभये अनील अडुर संजय निखारे मनोज पोतराजे पवन ढवळे चांद सयद सागर वनकर रणजित जांभूळकर गणेश रासपायले विकास गोटे  प्रमोद शात्रकार जहीर खान कादरी विनोद शेरकी अल्ताफ शेख निलेश बेडेकर राजेंद्र खांडेकर सुशांत शरमा कृष्णा चंदावर राजेश यादव शाम बोबडे सुरज सिंग सचिन कुडे सतीश तायडे उमेश आष्टांकर बंडू गोरकर सत्यम गानार अक्षय शेंडे अमोल मत्ते रितेश वर्मा
आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्‍येने भाजपा कार्यकर्ते या स्‍वागताप्रसंगी उपस्थित होते. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन भक्‍ती मार्गाला समर्पित होते. ज्ञान, निती व अध्‍यात्‍मक यांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांनी सत्‍यशोधक बाणा कायम जपला. असहाय्य जनतेची मदत करत साधुसेवा करण्‍यावर भर देत त्‍यांनी जी शिकवण आपल्‍याला दिली आहे, त्‍याचा अंगीकार हीच त्‍यांना खरी आदरांजली ठरेल, असे उदगार चंद्रपूर भाजप महानगर राहुल पावडे यांनी काढले.शहरात निघालेल्‍या या भव्‍य शोभायात्रेचे स्‍वागत करत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भक्‍तीमय वातावरणात जल्‍लोष साजरा केला.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here