========================
*चंद्रपुर*
======================
जवळ फिर्यादी नामे प्रत्युश सचिन मुन रा. बगडखिडकी चंद्रपुर यांचा मोबाईल अज्ञात तीन मुले मोपेड गाडीने येउन जबरीने हिसकावुन नेला, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
=========================
नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधीर नंदनवार साहेब, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत पो.स्टे. चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेउन पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथील डी. बी पथक मधील सपोनि. मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. शरिफ शेख तसेच डि.बी. कर्मचारी असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन गुप्त बातमीदार व सिसीटिव्ही फुटेजच्या आधारे विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेवुन खालील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अप. क्र. ७७७/२०२३ कलम ३९२, ३४ भादंवि
जप्त माल :- १) रेडमी कंपनीचा मोबाईल कि.अं. ८००० रू.
२) गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मोपेड गाडी अॅक्टीवा एम. एच. ३४, सिसि.१४४७ किं. अं.५०,००० रू.
असा एकुण ५८,००० /- रू. चा माल जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंग परदेशी सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. सुधीर नंदनवार सा. यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षक श्री. सतिशसिंह राजपुत, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि शरिफ शेख, स. फौ. विलास निकोडे, पो.हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. संतोष पंडीत, पोहवा. सचिन बोरकर, पो. हवा. निलेश मुडे, म.पो.हवा. भावना रामटेके, नापोशि. चेतन गज्जलवार, पो.अं. इम्रान खान, संतोष कावळे, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्यातील पुढील तपास पोउपनि. शरिफ शेख करीत आहे.
======≠================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793