*शासकीय योजनांच्या जनजागृती करिता कलापथकचे सादरीकरण*

0
33

=========================

 *चंद्रपूर*

======================

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी कोरपना आणि जिवती केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. कोरपना तथा जिवती केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण या विषयावर प्रबोधन करण्यात येणार आहे.
कलापथकाचे सादरीकरण कोरपना व जिवती केंद्रातील भोलापेठार, आंबेझरी, भारी, टांगाळा, लांबोरी या गावात करण्यात येत असून कार्यक्रमाचे आयोजन मुरुंगानंथम एम., प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात येणार आहे. कलापथकाच्या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटिल,नगर सेवक,सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामवासी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राहुल पेंढारकर यांनी केले आहे.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here