========================
*श्री शशि ठक्कर, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपुर*
=======================
यांचा सत्कार.
=====================
राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ,सावित्रीबाई फुले, फातिमा शेख ,राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्तिक जयंती निमित्त १२जानेवारी २०२४ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार -संवाद हा कार्यक्रम श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम ,वडगाव चंद्रपूर येथे ‘काळानुरूप बदलती पत्रकारिता व आव्हाने ‘सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेधक अनुभव या विषयावर पत्रकार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून झी न्यूज २४तास मराठी मीडिया समूहाचे चंद्रपूर गडचिरोलीचे विभागाचे वरिष्ठ पत्रकार आशिष अंबाडे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून पर्यावरण वन व हवामान मंत्रालय, दिल्ली माजी सदस्य तथा अध्यक्ष ग्रीन प्लानेट सोसायटी ,पर्यावरण संस्था चंद्रपूर पर्यावरणवादी अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख जनमंच सदस्य रवींद्र तीराणिक तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य मार्गदर्शक म्हणून राम आखरे भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष, जनमंच सदस्य, श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम चे अध्यक्ष डॉ. शंकर झोडे (एमडी )होमिओपॅथी कॉलेज खामगाव ,सेवाश्रम चे सचिव अरुण बावणे, पत्रकार संघाच्या चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा जनसंपर्कप्रमुख प्रा .डॉ.मंजुषा सागर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर पतिवार यांची प्रामुख्याने उपस्थित होती. सदर कार्यक्रमात मान्यवर वक्ते व मार्गदर्शकाच्या उपस्थितीत — श्री शशि ठक्कर . चंद्रपुर कार्यकारिणी पदाधिकारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपुर। यांना सहभाग सन्मानपत्र व शाल- श्रीफळ ,वृक्ष रोपटे आणि स्वामी विवेकानंदांची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी ,प्रतिनिधी प्रसार व वाहिनी माध्यम त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069