*मा.सां.कन्नमवार यांचे कार्य सर्वसामान्याला प्रेरणा देणारे – महेश कोलावार*

0
31

=====================

  *चंद्रपूर* 

=======================

संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री

=======================

मा.सां. कन्नमवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी मा.सा. कन्नमवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

========================

यावेळी आपले विचार मांडताना महेश कोलावार यांनी म्हणाले की मा.सा.कन्नमवार यांचे कार्य सर्वसामान्याला प्रेरणा देणारे आहेत.
घरोघरी वृत्तपत्रे विकणारा,रेल्वे स्टेशनवर टिकीट तपासनीस म्हणून काम करणारा,चंद्रपूर सारख्या अतिदुर्गम भागातून आलेला एक सामान्य माणूस आपल्या इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो ही बाब निश्चितच गौरवाची व प्रेरणादायी आहे.मारोतराव कन्नमवार हे स्वबळावर मोठे झालेले नेतृत्व आहेत.ते केवळ थोर देशभक्तच नव्हते तर धुरंधर राजकारणी,उत्तम खेळाडू, प्रतिभावंत साहित्यिक,प्रभावी वक्ते व पत्रकारही होते.

========================

कन्नमवार हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते.पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे १९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यांनी जातांना विदर्भातले नेते मारोतराव कन्नमवार यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.परंतु दुर्दैवाने १९६३ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले.मा.सां कन्नमवार यांनी
आपल्या अल्पशा कारकिर्दीत का असेना अनेक संरक्षण प्रकल्प महाराष्ट्रात आणले.
ओझरचा मिग विमान कारखाना,वरणगाव,
भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने त्यांच्या अचूक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात आले.

===========================

अश्याप्रकारे अनेक कार्य मा.सां कन्नमवारांनी करून स्वत:ची एक अमीट छाप निर्माण केली.एकूणच त्यांची राजकीय कारकिर्द पण महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवून गेली.

=========================

मा.सां.कन्नमवारांचे विचार व कार्यशैली प्रत्येकांनी आपल्या प्रत्यक्ष जीवनात आदर्श ठेवून ते आचरणात आणावे असे आवाहन आणि सोबतच आजपर्यंत कुठल्याच सरकारनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासकीय पद्धतीने जयंती,पुण्यतिथी साजरा करण्याचा निर्णय घेतला नाही अशी खंतही
महेश कोलावार यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.   

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here