===================
*बल्लारपूर*
======================
बुधवार दि-17/01/2024
======================
– बल्लारपूर शहरात तेलगू भाषिकांची संख्या 37% च्या जवळपास आहे. हा भाग तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेच्या जवळपास आहे व बल्लारशा रेल्वे जंक्शन असल्याने याठिकाणी प्रवाशांची नेहमीच अधिक गर्दी असते. कौटुंबिक , व्यावसायिक व इतर कारणांसाठी तेलगू भाषिक प्रवासी महाराष्ट्र-तेलंगाना असा सतत प्रवास करीत असतात परंतु रामगिरी पॅसेंजर व भाग्यनगरी एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर इथल्या तेलगू भाषिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन शहरातील तेलुगू वारी फाऊंडेशन ने यासंदर्भात रेल्वे प्रशासनास निवेदन देऊन बल्लारपूर-काजीपेट तसेच हैदराबाद साठी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मंगणी केली. जर असे झाले नाही तर तेलूगू भाषिकांच्या हितासाठी आक्रमक भुमिका घेण्याचे ही आव्हान देखील करण्यात आले. यावेळेस तेलुगू वारी फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष- आनंद महाकाली, सचिव- प्रा. नागेश्वर गंडलेवार, कोषाध्यक्ष- उमेश कोलावार, संजय मुपीड़वार, श्रीनिवास आऊला, गणेश सिलगमवार, मलेश येल्लावार, श्रीनिवासन तौटवार आणि इत्यादी संस्थेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069