*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने महाकाली मंदिरात स्वच्छता अभियान*

0
16

=======================

    *चंद्रपूर*

=======================

22 जानेवारीला अयोध्या येथे श्री प्रभु रामाची प्राणप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांतर आज चंद्रपूरातील माता महाकाली मंदिर येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, महाकाली मंदिराचे विश्वस्त सुनिल महाकाले, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवण सराफ, मिलींद गंपावार, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, करणसिंग बैस, तापोष डे, दिपक पदमगीरवार, विनोद अंनतवार, हेरमन जोसेफ, प्रकाश पडाल, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, चंदा ईटनकर, वंदना हजारे, अनिता झाडे, शांता धांडे, माधुरी बावणे, सतनाम सिंग मिरधा, शंकर दंतुलवार, ताहिर हुसेन, किशोर बोल्लमवार, नकुल वासमवार, मुकेश गाडगे, अॅड परमहंस यादव, बादल हजारे आदींची उपस्थिती होती.
येत्या 22 जानेवारीला अयोध्येत आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातही 22 जानेवारीला राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात यावे असे आवाहण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आमदार किशोर जोरगेवार यांनीही मंदिरामध्ये स्वच्छता मोहिम सुरु केली  असुन याची सुरुवात चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या माता महाकालीच्या मंदिरातून करण्यात आली आहे.
आज गुरुवारी सकाळी 8 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत महाकाली मंदिर परिसर स्वच्छता मोहिमेला सुरवात करण्यात आली. यात चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन, श्री महाकाली माता महोत्सव समिती, यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संघटनेने सहभाग घेतला होता. यावेळी मंदिर परिसर संपूर्ण स्वच्छ करण्यात आला. स्वत: आमदार किशोर जोरगेवार यांनीही या मोहिमेत सहभाग घेत स्वच्छता केली.

==========================

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. मुंबई येथुन या माहिमेला सुरवात झाली. आपण विकासाची कामे करत असतो सोबतच स्वच्छता हा ही महत्वाचा विषय राहिला आहे. त्यामुळे शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीकोणातुन आज महाकाली मंदिर येथून या मोहिमेची सुरवात झाली आहे. माता महाकालीचे देवस्थान चंद्रपूकरांसाठी श्रध्दा स्थान आहे. येथे हजारो भाविक दररोज येत असतात. त्यामुळे हा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहीला पाहिजे. या ठिकाणी आल्यानंतर मानसाला मन शांती मिळत असते. त्यामुळे या ठिकाणाहुन आम्ही या स्वच्छता मोहिमेची सुरवात करत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून नागरिकांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत आपले शहर स्वच्छ ठेवावे असे आवाहण यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना केले आहे. तर उद्या सकाळी आठ वाजता काळाराम मंदिर येथे स्वच्छाता अभियान राबविण्यात येणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here