*शिवकालीन वस्तु प्रदर्शनी व अण्णाजीच्या कार्याच्या आठवणी*

0
46

=======================

 *भगवती*

=======================

*अमित गुंडावार यांचे आदर्श कार्य…!*

======================

भद्रावती येथील लोकमान्य महाविद्यालयामध्ये *श्री. अमित चंद्रकात गुंडावार* यांनी शिवकालीन प्रदर्शनी व अण्णाजीच्या जीवनातील कार्य व आठवणीला उजाळा दिला.
शिवकालीन वस्तुसाठा संग्रह करणे व त्यांचा परिपूर्ण अभ्यास करुन त्याचे जतन करणे फार अवघड असून अमितने हे सर्व करण्यासाठी आपले अंगी असलेल्या कौशल्य, आवड, जिद्द व चिकाटीचा पुरेपूर वापर केला.
वेळप्रसंगी त्याला आई-वडिलांनी एखादी वस्तु घेण्यास पैसे दिले असता त्याने ती वस्तु न घेता शिवकालीन वस्तुचा शोध घेण्यासाठी खर्चीत करुन शिवकालीन वस्तु संग्रहीत केल्या. हे कार्य म्हणजे एक ध्यास व जिद्द असुन नविन पिढीला एक दिशा देणारे आहे.
ऐवढेच नव्हे तर अण्णाजीने आपल्या जीवनात सर्वांना एकसंघ ठेवून समाजहित कार्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी अण्णाजीच्या कार्याच्या संग्रह देखील प्रदर्शनीमध्ये ठेवुन भविष्यात युवा पिढीला जीवन जगत असताना जीवनाचे महत्त्व पटवून देणारे आहे.
भविष्यात शिवकालीन वस्तुचे संग्रह व अण्णाजीचे राष्ट्रहित कार्य यांची दखल घेत केंद्र व राज्य सरकार अमितला सन्मानीत करेलच, भविष्यात शिवकालीन संग्रहामुळे अमितचे व भद्रावतीकरांचे नाव जागतिकपातळीवर नावलौकिक प्राप्त करेल, परंतु अमितने शिवकालीन प्रदर्शनी व्दारे कमी वेळात गुंडावार परिवाराचे व चंद्रपुर जिल्हयाचे नाव लौकिक केले ते आम्हा सर्व वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील जनतेला अभिमानास्पद असेल…! =========================

*अमितच्या कार्याला शुभेच्छा…*

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here