=======================
*चंद्रपूर*
=========================
देशाचे आदरणीय पंतप्रधान *नरेंद्रजी मोदी* यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित नमो नवमतदार संमेलन संपूर्ण देशामध्ये 5000 पेक्षा अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यात चंद्रपूर महानगर येथे जनता महाविद्यालय व राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये माननीय नामदार *सुधीर भाऊ मुनगंटीवार* यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर *जिल्हाध्यक्ष राहुल पावडे* व *भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर* यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आला.
शेकडोच्या संख्येमध्ये नवमतदार विद्यार्थी व विद्यार्थिनी मोदिजिंचे संबोधन ऐकण्यासाठी जमा झाले होते. कार्यक्रमात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी ओबीसी विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक भाऊ जीवतोडे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश जी गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण जी पाझारे, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, उपाध्यक्ष व सिनेट सदस्य यश बांगडे, देवानंद वाढई, प्रदीप किरमे, विनोद शेरकी, रवी लोणकर, रवी जोगी, गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, मनीष पिपरे, पप्पू बोपचे, संजय पटले, राहुल पाल, स्नेहीत लांजेवार, कुणाल गुंडावार, प्रवीण उरकुडे, प्रवीण गिलबिले, यश ठाकरे, मयूर चहारे, आकाश मस्के, अनुप शर्मा, ऐश्वर्य बांगडे, जयश्री आत्राम, महेश कोलावार उपस्थित होते.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















