*वरोरा येथील कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा*

0
42

==========================

          *वरोरा*

============================

वरोरा -दिनांक 26 जनवरी 2024 वरोरा येथील निलकंठराओ शिंदे प्रशासकीय महाविद्यालयआत झालेल्या कार्यक्रमाला प्रा धनराज आस्वले, जेष्ठ समाजसेवी व अध्यक्ष श्रीनिवाम शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट, प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स. ८.३० वाजता छवजारोहन करण्याने आले. विद्यार्थीनी देशभक्तीपर गिते व नृत्य, सादर केले. प्रा. पियुष लांडगे यांनी गीत सादर केले तर कु दिव्या पेचे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. आस्वले सर यांनी ३९ देशात भ्रमण केले व त्यांच्या अभ्यासानुसार जगात भारतीयांचे स्थान उच्च आहे असे त्यांच्या भाषणातून निदर्शनास आले. आले. त्यांनी आपल्या मृदू वाणीतून विद्यार्थाना प्रजासत्ताकाचा अर्थ समजावून दिला तसेच देशसेवेसाठी आदर्श नागरिक बना असा संदेश दिला. संस्थेचे मचिव डॉ कार्तिक शिंदे सरांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सर्वोतपरी कटीबद्ध रहनार असे आश्वासन दिले एवढेच नाही त्तर विद्यार्थी कुनाल ‌शेंडे व रक्षा काळे यांच्या ग्रुप डान्स पोलीस स्टेशन, वरोरा रंगमंचावर सादर करण्यासाठी, विद्याथ्र्याना उद्‌युक्त केले. प्राचार्य गुरुदेव जुमडे यांनी दिनाच्या शुभेच्छा देताना, विद्यार्थीधर्म व शिक्षक धर्म यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्तसंचालन प्रा. प्रणाली नरड यांनी केल तर आभारप्रदर्शन प्रा. सीमा बोभाटे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. रेश्मा नरडे, प्रा. प्रमोद पाठक, डॉ. प्रशांत पाठक, प्रा. प्रा.रुपेश टाळे, इंदिरा निखाडे तसेच समस्त प्राध्यापक, विद्यार्थी, साईनागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक, प्रा-मंडल इत्यादींची उपस्थिती लाभली, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रोशन डोंगरे, मानसी गमे, प्रणाली मोडक, प्रणाली मेश्राम, आत्राम, कु चवले यांनी अथक परिश्रम घेतले.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here