*यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन*

0
39

======================

यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने महिला स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी महिलांना हळदी कुंकु लावत वाण वाटप केले.

======================

या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, आशा देशमूख, विमल काटकर, स्मिता वैद्य, कौसर खान, वैशाली मेश्राम, अनिता झाडे, पौर्णिमा, अस्मिता दोनाडकर, सोनाली आंबेकर, माधूरी निवलकर, वंदना हजारे, अल्का मेश्राम, दुर्गा वैरागडे, माधूरी बावणे आदींची उपस्थिती होती.

========================

यंग चांदा ब्रिगेड या संस्थेने कमी काळात समाजिक क्षेत्रात मोठे नाव केले आहे. समाजकारण याबरोबरच महिला सक्षमीकरणावर संस्थेचा भर राहिला आहे. या दिशेने संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान शणीवारी संस्थेच्या वतीने महिलासाठी स्नेहमिलन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांना वाण वाटप करुन तिळगूळ देण्यात आले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दरवषी असे कार्यक्रम आयोजीत केल्या जाईल असे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here