==========================
गावकर्यांनी मानले आभार, पक्का रस्ता बनविण्यासाठी निधी देणार
==========================
चंद्रपूर
=============================
खुटळा येथील लवजी नगर कडे जाण-या मार्गात एकाचे ले – आउट असल्याने सदर ले – आउट धारकाने गावाकडे जाणारा मार्ग अडविला होता. त्यामुळे गाव-यांना अडचण निर्माण झाली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे सदर रस्ता गावक-यांसाठी मोकळा करुन दिला आहे. तसेच येथे पक्का रस्ता तयार करण्यासाठी निधी देणार असल्याचे म्हटले आहे.
=============================
खुटाळा येथे लहुजी नगर आहे. मागील 40 वर्षापासून सदर गाव येथे असून या गावाकडे जाणारा एक मुख्य मार्ग आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सदर मार्ग आपल्या ले – आउट मध्ये असल्याचे सांगत ले – आउट धारकाने गावक-यांचा रस्ता बंद केला होता. अशात गावक-यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यान गावातील एका मुलीची प्रकृती खराब झाली. तीला रुग्णालयात नेण्यासाठी सदर मार्गाचा वापर करु दिल्या गेला नाही असा आरोप गावक-यांनी केला आहे. ही बाब कळताच आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावाला भेट देत गावक-यांची समस्या समजून घेतली. यावेळी संबधीत ले – आउट धारकाला बोलावून त्याची समज काडण्यात आली असून सदर मार्ग पुन्हा गावक-यांसाठी मोकळा करण्यात आला आहे.
============================
तसेच सदर मार्गाचे पक्के बांधकाम करण्यासाठी आवश्यक तिथका निधी आपण उपलब्ध करुन देउ अशी ग्याही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गावक-यांना दिली आहे. गावकडे जाण्याचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. यापुढे असा प्रकार घडता कामा नये. असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी गावक-यांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची आणि गावक-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069