=============================
*किशोर टोंगे*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन*
===========================
शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी अचानक गारपीटसह मोठ्या प्रमाणात पाउस झाल्याने तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांचे ९०% रब्बी पिक हातातून गेले आहे. ही नुकसान भरपाई पंचनामे करून तात्काळ द्यावी यासाठी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते, सामाजिक कर्यकर्ते किशोर टोंगे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली.
==========================
यावेळी ते म्हणाले की, यापूर्वीच माझ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकांवर आलेल्या येलो मोझाक रोगामुळे पुरता संकटात होता त्यात हे गारपीट आमच्या शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे असून त्यांना अधिक संकटात नेणारा हार्दिक अवकाळी धक्का असं ते म्हणाले आहे.
=========================
यासाठी तातडीने दोन्ही तालुक्याच्या तहसीलदारांनी यंत्रणेमार्फत तातडीने नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व पंचनामे पूर्ण करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
==========================
शनिवारी रात्री अचानक वादळाला सुरवात झाली व अचानक गारांसह पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांचे हरभरा, गहू व तूर या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात व परिसारत वृक्ष कोसळले आहे. यात अनेक गावांचा व शेतपंपाचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला असून तो पूर्ववत करण्यात यावा असंही ते म्हणाले.
===========================
प्रशासनाने तत्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069