*एकात्मक मानवतावाद निर्माण करणारे पंडीत दीनदयाल उपाध्याय – राहूल पावडे*

0
31

=============================

पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्य भाजपा कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. 
=============================
चंद्रपूर :- एकात्मक मानवतावाद विचारधारा निर्माण करून सर्व समावेशकता निर्माण करून एक मजबूत आणि सशक्त भारत निर्माण करू पाहणारे राजकारणी साहित्यिक पत्रकार पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण आयुष्‍य राष्‍ट्राला समर्पीत केले होते असे भावपूर्ण उद्गार भाजपा महानगर अध्यक्ष  राहूल पावडे यांनी व्यक्त केले.गिरणार चौकातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे बोलत होते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या स्वप्नातील व विचारातील भारत उभा करण्याचे कार्य भारतीय जनता पार्टी करीत आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी अहोरात्र झटत आहे असेही ते म्हणाले. यावेळी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्‍प वाहून आदरांजली देण्यात आली. यावेळी रामपाल सिंग, राजेंद्र खांडेकर, सय्यद चाॅंद भाई, अजय सरकार, गणेश रासपायले, राजू येले, जहीर खान कादरी, रवी जोगी, बालू कोलणकर, अनिल अडूर, अमोल मते,रविंद्र मांढरे, महेंद्र कार्लेकर, सचिन जेंगठे, मंगेष ठाकरे, सुरज बोरूले, आशिष मोहुर्ले, शुभम नागोसे, सुमित चाहारे, विश्विजीत लेनगुरे, प्रविण कर्लीकर, रमन बोरूले, प्रविण चौधरी, आकाश कर्लीकर, अनुज चांदे आदींची उपस्थिती होती.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here