=======================
*चंद्रपूर*
========================
श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर मधील धर्मशाळेत रविवार दिनांक १८/०२/२०२४ ला श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व श्री लहरी सेवा समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्त तपासणी, व जनरल आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.सकाळी दहा वाजता श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर चे व्यवस्थापक श्री सुनील नामदेवराव महाकाले, श्री अनिल महाकाले, सौ.निमिषा अनिल महाकाले, व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी डॉ चिंचोले सर ,जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते श्री दिपप्रज्वलन करण्यात आले, श्री महाकाली मातेला पुष्प हार अर्पण करून आरोग्य शिबीर सुरु करण्यात आले,सदर शिबिरात सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर मधील डॉ संदीप पिपरे दंत शल्य चिकित्सक, डॉ श्रीराम चांडक दंत शल्य चिकित्सक, डॉ मनीष मोते जनरल फिजिशियन, डॉ रंजना गवारकर, जनरल फिजिशियन, डॉ प्रणय तुमसरे, श्री सचिन जुमडे दंत सहाय्यक, श्री तुषार रायपुरे सामाजिक कार्यकर्ते, सोनु कातकर,मनिषा गेडाम स्टाफ नर्स, श्री आकाश पिल्ले, विवेक मेश्राम ऑफथरमिक ऑफीसर, श्री रत्नधोष मेश्राम, श्री हरिहर मडावी औषभ निर्माण अधिकारी
व श्री संदीप चौधरी यांनी सदर आरोग्य शिबिरात आरोग्य सेवा दिली. शिबिरात सहभागी एकुण २७८९ रुगणवर तपासणी व औषधोपचार करण्यात आले. यात प्रामुख्याने दंत दोष, ताप, सर्दी, खोकला, जोखमीचा माता व नेत्र दोषी रुग्णांना मोफत औषधोपचार
. करण्यात आला. नेत्र तपासणी मध्ये ८४२ रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले व शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना पुढील उपचारासाठी तारीख देण्यात आली.
सकाळी दहा वाजता शिबिर सुरू झालेलं तीन वाजेपर्यंत सुरू होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री माणिक औ.नि.अधिकारी व महाकाली देवस्थान चंद्रपूर चे श्री गणेश शेळके, श्री राजु चिटमलवार व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069