*वारली चित्रातून केल्या अंध शाळेच्या भिंती बोलक्या* *अंध विद्यालयाचा उपक्रम*

0
44

=======================

*वरोरा*  

=========================
आनंदवन येथील अंध शाळेत इयत्ता ६ “वीच्या पाठ्यक्रमात असलेल्या नवव्या प्रकरणातील ‘ वारली चित्रकला हा प्रत्यक्षात अंध विद्यार्थ्यांना कसा अनुभवता येईल म्हणून ‘ माझी शाळा,माझा उपक्रम’ या विषयावर आधारित महाराष्ट्राची संस्कृती आमची शान या संकल्पनेवर अनूसरून आदिवासी वारली चित्रकलेचा समृद्ध वारसा जोपासण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. आचार्य पुरस्कार प्राप्त तथा राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी स्वतः हे वारली चित्रे शाळेच्या समोरील मोकळ्या भिंतीवर अंशतः अंध असणाऱ्या विद्यार्थ्यांसह डोळस विद्यार्थ्यांच्या समवेत संपूर्ण भिंतीवर अतिशय देखण्या स्वरूपात वारली चित्रे रेखाटुन अंध शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. या चिंत्रामध्ये पर्यावरण संकल्पनेवर पाठ्यातील परिसंस्था, वाळवंट, जंगली प्राणी,आजुबाजुच्या परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर पहाड, वने, नृत्ये, घरदार , शेतीचे हंगाम, शिवारे इत्यादी अनेक विषयांना धरून भिंतीवर चित्रे रेखाटली गेली. चित्रे रेखाटतांना प्रामुख्याने वर्तुळ, त्रिकोण, चौरस यांसारख्या भौमितीय आकारांचा वापर केला गेला. संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडु यांनी या उपक्रमाचे कौतुक करून या कलेला त्यांनी प्रोत्साहन देऊन अंध विद्यार्थ्यांंचे मनोबल वाढविले. शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर यांच्यासह शाळेच्या शिक्षिका तनुजा सव्वाशेरे, भावेश बाथम, आशीष गेडाम, मोहीत धोटे, अनिकेत घोसले आर्या कडू विद्यार्थ्यांसह समिधा बांगडकर, मेंढे आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदविला, यशस्वीतेसाठी जितेंद्र चुदरी , किशोर घोडाम, विलास कावणपुरे, साधना माटे, वर्षा उईके, माला भट, कृष्णा डोंगरवार, यांचे सहकार्य लाभले..

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here