*राष्ट्रीय स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवनाऱ्या चंद्रपूर च्या श्रेया इथापे ह्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सत्कार*

0
50

===========================

        *चंद्रपूर*

========================

N i D J A M (19th नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट जुनिअर ॲथलेटिक मीठ ) आंतर जिल्हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2024गुजरात येथील अहमदाबाद येथे दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी 2024 पार पडली
ह्या स्पर्धे मध्ये देशाच्या सर्व राज्यातून महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यामध्ये महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील श्रेया नितीन राव इथापे ह्यांनी 16 वयोगटातील 80 मीटर हरडलं या स्पर्धे मध्ये 12.26 सेकंद वेळ घेऊन स्पर्धा पूर्ण केली व ह्या स्पर्धे मध्ये सिल्व्हर (रजत ) पदकांची मानकरी ठरली
संपूर्ण देशातून चंद्रपूर जिल्ह्याची स्पर्धक श्रेया इथापे रजत पदक प्राप्त करून आपल्या जिल्हाचा मानाचा तुरा संपूर्ण देशात गाजवला व आपल्या जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात गाजवला
ह्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा अध्यक्ष बब्बू भाई अहमद इसा ह्यांनी त्यांचे कौतुक केले
व आज दिनांक 21/2/2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षांचे चंद्रपूर शहर जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ जैस्वाल व अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू अहमद इसा ह्यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये श्रेया इथापे ह्यांच्या घरी जाऊन श्रेया इथापे व त्यांच्या आई वडिलांचा शाल, श्रीफळ व गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला
ह्या वेळेस जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे साहेब, महिला शहराध्यक्ष शिल्पा कांबळे, बंडू चवरे, भैय्याजी मानकर, सुरज दुर्गे, अन्सार भाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या जिल्ह्याचं नाव देशात गाजवणाऱ्या श्रेया नितीन राव इथापे यांना आमच्या पक्षाच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येईल असे आश्वासन शहर जिल्हाध्यक्ष दीपक जैस्वाल, व अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बू अहमद इसा यांनी इथापे परिवारांना दिला,

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here