*भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत*

0
27

==========================

*चंद्रपूर*

============================

शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप
=====≠======================

भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरात शोभायात्रा काडण्यात आली होती.सदर शोभायात्रा गांधी चौक येथे पोहचल्यावर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.

============================

यावेळी सहायक पोलिस उपनिरिक्षक दिपक चालुरकर, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, शहर संघटक विश्वजीत शाहा, शहर संघटक करणसिंह बैस, सतनाम सिंह मिर्धा, करण नायर, कुणाल जोरगेवार, राजिक खान, विमल कातकर, दर्शन भुरटकर, महेश गोहोकार आदिंची उपस्थिती होती.
भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने शोभायात्रा काडण्यात आली होती. विश्वकर्मा चौकातून सदर शोभायात्रेला सुरवात झाली. ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत एकोरी वार्डातील समाज मंदिरात पोहोचली. येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. दरम्यान शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता. सदर शोभायात्रा स्वागत मंचाजवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन नमन करण्यात आले. या प्रसंगी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. सदर शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here