“*कायद्याचे राज्य आणण्यासाठी वकिलांनी काम केल्यास न्यायव्यस्थेचा दर्जा उंचावेल”- ॲड.असीम सरोदे*

0
29

=============================

   *चंद्रपूर*

============================

न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा घटक म्हणून ‘वकीलांनी’ कायद्याच्या नियमांचे राज्य आणण्यासाठी आपला व्यवसाय सांभाळून काम केले तर न्यायव्यस्थेचा दर्जा वेगळ्या उंचीवर जाईल असे मत संविधान विश्लेषक ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मांडले. चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनने जिल्हा न्यायालयात आयोजित संवाद कार्यक्रमात वकील असीम सरोदे बोलत होते. यावेळी चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड गिरीश मारलीवर, उपाध्यक्ष ऍड मलक शाकीर, सह-सचिव स्वार्निश घोडेस्वार, ऍड दत्ता हजारे, ऍड वैशाली टोंगे, ऍड वर्षा जामदार, ऍड जयंत साळवे, ऍड श्रीधर झाडे, ऍड मनोज कवाडे, कार्यकारिणी सदस्य तसेच अनेक वकील उपस्थित होते.
आपण वकील म्हणून न्याय व समानतेचे रक्षक व पालानकर्ते आहोत या भावनेतून तीन वर्षांच्या आता वकिली केलेल्या व वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी कमाई असेल त्या नवोदित वकिलांना दरमहा 5000 रुपये स्टायपेंड मिळावे यासाठी जनहित याचिका दाखल केल्याची माहिती ॲड. सरोदे यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील उच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन हायब्रीड पद्धतीने चालवावे या आम्ही दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या यशानंतर जिल्हा न्यायालयातील वकिल आता चंद्रपूर-गडचिरोली मध्ये बसून उच्च न्यायालयात केसेस चालवू शकतात असे सांगून असीम सरोदेंनी वकिलांना आवाहन केले की तंत्रज्ञानाचा वापर करून वकिली वाढवावी. वकिली व्यवसायातील ताणतणाव व आरोग्य समस्या वकिलांनी हलक्यात न घेता स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्यात, अती चहा-कॉफी पिणे त्वरित बंद करावे.

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here