*दिवसेन दिवस संडे मार्केटला चंद्रपुरकरांची चिक्कार गर्दी*

0
63

========================

✍️….निलेश ठाकरे चंद्रपुर          

==========================

चंद्रपुर नगरी ही ऐतिहासिक नगरी पैकी एक आहे. या नगरीला एक वेगळाच वारसा लाभला असुन या नगरीचे महाराष्ट्रात एक वेगळे स्थान आहे. या नगरीची लाेक संख्या सध्या तरी विस लाखाचा जवळ पास पाेहचली आहे. या नगरीत कामा निमित्य बाहेर जिल्ह्यातुन, गावातुन येणार्या लाेकांची संख्या दिवसेन दिवस झपाट्यानी वाढत जात असल्याचे दिसुन येते. त्या मानाने चंद्रपुरात एकच मुख्य बाजार व कस्तुरबा राेड, मुख्य राेड असे दाेनच मुख्य रस्ते आहेत. जर का येथिल लाेकसंख्या लक्षात घेता मुख्य मार्केट सुध्दा चंद्रपुरकरांना कमी पडतांना दिसेल. परंतु एकीकडे देशात महागाई वाढत असतांना आठवळ्यातुन एक दिवस लागत असलेल्या संडे मार्केटमुळे चंद्रपुरकरांना स्वस्त वस्तु उपलब्ध हाेत आहेत. त्या मुळे संडे मार्केटला चंद्रपुरातिल ग्राहक वर्गांकडुन उत्तम प्रतिसाद मिळत असुन ग्राहक ही सुखावलेले दिसुन येतिल. संडे मार्केटचे व्यापारी ही सुध्दा ग्राहकांना नव्या सामग्री उपलब्ध करून देत आहेत. दर संडेला हाेणारी उलाढाल बघता मुख्य मार्केटचे व्यापारी सुध्दा आपले प्रतिष्ठान संडेला सुध्दा सुरू ठेवु लागले आहे. परंतु जाे उदंड प्रतिसाद संडे मार्केटला मिळत आहे ताे संडेला मुख्य मार्केटला ईतर दिवशी ही मुख्य मार्केट व्यवसाईकांना मिळतांना दिसुन येत नाही. परंतु संडे मार्केटला कपडे, कॉस्मेटिक, डिझायनदार ज्वेलरी, व ईतर काही महिलांना हवी असणारी सामग्री, वस्तु ह्या स्वस्त दरात उपलब्ध हाेत असल्याने चंद्रपुरकर शॉपिंग करण्यास दर संडेची उतस्कुतेने वाट बघत असतात. त्यामुळे दिवसेन दिवस संडे मार्केटला चंद्रपुरकरांची चिक्कार गर्दी हाेतांना दिसुन येते. हाच संडे मार्केट सर्व प्रथम मुख्य रस्त्यावर डॉ.बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात लागत हाेता. परंतु मुख्य रसत्यावरिल वाहतुकीच्या काेंडीमुळे आणि मुख्य रस्त्यावरील व्यवसाईकांच्या तक्रारीमुळे हा संडे मार्केट रघुवंशी कॉम्पलेक्स समाेरील हलविण्यात आला. परंतु काही कालावधीतच रघुवंशी कॉम्पलेक्स येथिल व्यवसाईकांनी संडे मार्केट तिथुन हलविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. आणि न्यायालयाचा आदेश असतांना तिथुन ही संडे मार्केट पुन्हा एकदा हलवावा लागला. चंद्रपुर महापालिकेला संडे मार्केट असाेसिएशनच्या वतीने अनेकदा पर्यायी जागा देण्यात यावी याकरिता आयुक्तांना निवेदन देण्यात आले. एक तर आधीच बेराेजगारी प्रचंड वाढत असतांना संडे मार्केट मुळे काहीना स्वताचा राेजगार मिळाला. त्यातुन अनेक कुटुंबाची उपजिविकेचे साधन उपलब्ध झाले. आणि अश्याच बेराेजगारांना राेजगार करण्याकरिता चंद्रपुर महानगरपालिका प्रशासन स्थाई जागा उपल्ब्ध करून देण्यास अपयशी ठरली आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी तातपुर्ती जागा म्हनुन बँरिस्टर राजाभाऊ चाेेैक ते झाडे हॉस्पिटल पर्यंत संडे मार्केटला संडेला मार्केट लावण्यास सांगण्यात आले. तेव्हा पासुन निरंतर संडे मार्केट या रसत्यावर सुरू आहे. या ही जागेवर संडे मार्केट भरत असल्याने डॉक्टर तसेच चर्च, व नागरिकांच्या हा मार्केट हलविण्यासाठी तक्रारी चंद्रपुर मनपाला जात आहेत. म्हुनुन संडे मार्केट असाेसिएशनचे अध्यक्ष हमिद रजा यांनी न्यायलयात धाव घेतल्यांनी व प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना संडे मार्केट तिथुन हलवता येत नाही. दर संडेला या संडे मार्केट येथे येणारे ग्राहक तथा अबुल कलाम आझाद गार्डन येथे सह कुटुंबा सहित येणार्या नागरिकांच्या चिक्कार गर्दी मुळे मुख्य रसत्यावरिल वाहतुकीची चांगलीच दमछाक हाेतांना दिसुन येते. या सर्व बाबी लक्षात घेता संडे मार्केटला पर्याई जागा म्हनुन गंजवार्ड मार्केट नाही तर रंघुवशी कॉम्पलेक्स येथिल जागाच स्थाई स्वरूपात देण्यात यावी. रघुवंशी कॉम्पलेक्स हीच जागा संडे मार्केटला साेईसकर ठरेल. जयंत टॉकिज चाैकातुन गंजवार्ड मार्केटकडे पर्याय राेड आणि मुख्य रसत्यावरून गाेकुल गल्ली मार्गे कस्तुरबा राेड कडे जाणारा मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे जर का रघुवंशी कॉम्पलेक्स येथेच पुन्हा संडे मार्केट भरल्यास संडे मार्केट व्यवसाईकांना, चंद्रपुरकरांना, आणि वाहतुकीची कुठली ही काेंडी न हाेता. वाहन चालकांना सुध्दा त्रास हाेणार नसल्याचे संडे मार्केट अध्यक्ष हमिद रजा यांनी चंद्रपुर मनपाला विनंती केली आहे.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=≠========≠===============

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here