*वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी घेतली आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री यांची भेट*

0
13

===========================

चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांनी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्माची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. 

===========================

आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची भेट घेतली. यावेळी बेले यांनी आपल्या उमेदवारी बद्दल माहिती देत आशीर्वाद घेतला. भेटीत अम्मा का टिफीनबद्दल जाणून घेतले.
अम्माने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शहरातील गरजवंताना दररोज घरपोच जेवनाचा डब्बा पोहचविला जात आहे. या कुटुंबासाठी अम्मा आधार ठरली आहे. त्यांच्या या उपक्रमाबदल अनेक संस्थानच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘अम्माने सुरु केलेले काम प्रेरणादाई आहे. आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी जात आहे. या भेटीमुळे नवीन ऊर्जा मिळाली’, असेही राजेश बेले म्हणाले

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here