सुधीर मुनगंटीवार यांना जाणता राजा पक्षाचा पाठिंबा लोकसभेत जाऊन मतदारसंघाच्‍या नव्‍हे तर देशाच्या प्रगतीत योगदान देतील संस्थापक अध्यक्ष नितीन उदार यांनी व्यक्त केला विश्वास

0
14

==========================

चंद्रपूर, 1 एप्रिल — चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना विविध समाजघटक, संस्था, संघटनांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मा. सुधीरभाऊ अभ्यासू आणि आपुलकीचे नेतृत्व असून लोकसभेत जाऊन मतदार संघाच्याच नव्हे तर देशाच्या प्रगतीत मोठे योगदान नक्की देतील, असा विश्वास व्यक्त करत जाणता राजा पक्षाने ना. श्री. मुनगंटीवार यांना निवडणुकीत पाठिंबा दिला आहे.
==========================
जाणता राजा पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष नितीन उदार यांनी त्‍यासंदर्भात एक समर्थन पत्र सुधीर मुनगंटीवार यांना दिले असून त्‍यात ‘प्रशासनातील गतिमानतेसाठी पडलेले पहिले “प्रभावी” पाऊल’ असा त्‍यांचा उल्‍लेख केला आहे. वेळोवेळी प्रशासकीय अडचणींचा निपटारा करणे, दफ्तरदिरंगाई होऊ नये म्‍हणून त्‍यासंदर्भातील कायदा अस्तित्वात यावा यासाठी मसुदा तयार करण्यापासून ते त्‍याची अंमलबजावणी करुन घेण्यापर्यंत सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे.
=============================
श्री.मा.सुधीर मुनगंटीवार अतिशय अभ्यासू असे हे नेतृत्‍व असून देशाच्या वरिष्ठ सभागृहात जावून ते मतदारसंघाच्‍या नव्‍हे तर देशाच्याच प्रगतीत योगदान देतील, अशी खात्री असल्‍यामुळे जाणता राजा पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्‍यांच्‍या पाठिशी उभे राहिले असून त्‍यांचा प्रचार व प्रसार करणे आमच्‍यासाठी अभिमानाची बाब असेल, असे नितीन उदार यांनी या पत्रात म्‍हटले आहे.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========≠=====≠=========
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here