*आशिक हुसैन यांची समाजवादी पार्टी प्रदेश सचिव पदावरून हकालपट्टी*

0
31

=======================

*समाजवादी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी केली होती पक्षश्रेष्ठी कडे तक्रार*

========================

चंद्रपूर(का. प्र.);समाजवादी पार्टी चे चंद्रपूर  जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी आशिक हुसैन यांची पक्षश्रेष्ठी कडे तक्रार केल्याने त्यांनी केलेल्या तक्रार ची त्वरित दखल घेऊन  महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टी चे  कार्याध्यक्ष  प्रताप होगाडे यांनी 2 एप्रिल रोजी आशिक हुसैन यांना प्रदेश सचिव पदावरून पदमुक्त केले अर्थात पदावरून हकालपट्टी केल्याने समाजवादी पार्टीतील जिल्ह्यातील कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी पक्ष श्रेष्ठी चे आभार मानले आहे.कारण की आशिक हुसैन हे पक्षविरोधी कार्य करीत असल्याचे उपरोक्त वरिष्ठांना चंद्रपूर जिल्हा समाजवादी पार्टी चे जिलाध्यक्ष सोहेल शेख यांनी तक्रारीत म्हटले होते.सोहेल शेख यांनी केलेल्या तक्रारीत सत्यता आढळून आल्याने  आशिक हुसैन यांची पदावरून हकालपट्टी केल्याने पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्यात उत्साह संचारला आहे .कारण की आशिक हुसैन हे स्वतः ला फार मोठा नेता समजून उलट सुलट बातमी सोशल मिडियात टाकून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत होते.
कोणाच्या हि विरोधात पोस्ट टाकून ते आपल्या विकृत मानसिकतेचा नेहमीच परिचय देतात तसेच अनेक वेळा कायदा व सुव्यवस्था भंग होईल अश्या पोस्ट ही वेळोवेळी टाकत असल्याने जनतेसह पोलिस विभागात ही त्यांच्या बद्दल रोष आहे. ईद ए मिलाद च्या वेळी ही त्यांनी मुस्लिम बांधवांना भडकवण्याचा हेतूने पोस्ट टाकली होती त्यावेळेस तत्कालीन रामनगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक  राजेश मुळे यांनी त्याला फाईल वर घेऊन खडे बोल सुनावले व त्यास 149 चे नोटीस ही दिले होते स्वतःच्या हाताने स्वतः ची पाठ थोपटून घेण्याची त्यांची ही सवय अतिशय निंदनीय असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या विरोधात अनाप शनाप लिहण्याची त्यांची ही वृत्त्ती अत्यंत त्रासदायकच आहे.एक वाक्य अनेक वेळा उदाहरणात अनेक वेळा बोलले जाते हत्ती  चालत असतो, कुत्रा भुंकत असतो.
या म्हणीप्रमाणे कुत्र्या सारख्या भूकणाऱ्यावर कोणीही सज्जन व्यक्ती लक्ष देत नाही हे मात्र विशेष. पण कुत्रा जास्तच अंगावर येत असेल तर त्याची खैर नाही असे अनेक वेळा बुद्धिजीवी वर्गाकडून बोलले जाते हे ही मात्र तेवढेच खरे!

===========================

आशिक हुसैन यांचे पदमुक्तत्ता आदेश दि. २ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टी चे  कार्याध्यक्ष  प्रताप होगाडे यांनी काढले असल्याची माहिती सोहेल शेख यांनी दिली.
आदेश असे आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरु झालेला आहे. सदर निवडणुकांच्या संदर्भात पक्षाचे ध्येय, धोरण व भूमिका राज्य कार्यकारीणी बैठकीत निश्चित झालेली आहे. त्यानुसार संबंधित सूचनांचे पालन आपल्याकडून होत नाही, असे दिसून येत आहे.सबब आपण पक्ष शिस्तभंग केलेला असल्याने आपल्याला तात्काळ प्रभावाने आजपासून “प्रदेश सचिव” या पदावरुन पदमुक्त करण्यात आले आहे.या संबंधीचे आदेश  पत्र सोहेल शेख यांना मिळाल्याची विश्वसनीय माहिती माहिती समाजवादी पार्टी चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांनी दिली आहे
महाराष्ट्र प्रदेश समाजवादी पार्टी चे  कार्याध्यक्ष  प्रताप होगाडे यांनी या आदेशाची प्रतीलीपी
माहिती साठी -प्रदेश अध्यक्ष अबू आसिम आझमी, प्रदेश प्रधान महासचिव परवेझ सि‌द्दीकी सह चंद्रपूर जिल्हाध्यक्ष  सोहेल
शेख यांना दिली आहे.पक्षातून डोकेदुखी गेल्याने आता पक्ष संघटन वाढणार असा विश्वास देखील पदाधिकाऱ्यांकडून  व्यक्त केलं जात आहे.हे मात्र विशेष!

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here