*बल्लारपुर येथुन तेलंगणा येथे रेल्वेनी दारूची वाहतुक करित असतांना ६७,१००/-रु दारुसाठा पकडला*

0
25

========================

चंद्रपूर(का.प्र.) आगामी लोकसभा निवडणुकीचा पाश्वभूमीवर आदर्श आचार संहिता सुरु असतांना अवैध्यरित्या दारुचा साठा बल्लारपुर येथून तेलंगाणा येथे रेल्वेनी जाणार असल्या बाबत गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशिर बातमी वरुन बल्लारपुर पोलीसांनी दिनांक- ०२/०४/२०२४ चे रात्री ०२/०० वा. ते ०२/४५ वा. चे सुमारास रेल्वे चौक, बल्लारपुर येथे धाड टाकली असता-
१) लाल रंगाच्या बॅगमध्ये एकुण-१४ नग रॉयल स्टैग, डिलक्स व्हिस्की प्लॉस्टीक बॉटल, प्रत्येकी २ लिटर प्रमाणे विदेशी दारु त्यांचे बॅच क्रं. ३६१५ दि.११/०२/२०२४ असे लेवल लागलेली प्रत्येकी कि.१८५०/ -रु. प्रमाणे कि. अं. २५,९००/-रु.
२) निळ्या रंगाच्या बॅग मध्ये एकुण-२०० नग देशी दारु रॉकेट संत्रा प्रत्येकी १०० एम.एल. भरलेल्या महाराष्ट्र निर्मीत प्लॉस्टीक शिशा प्रत्येकी कि.अं.३५/-रु. कि.अं.७०००/-रु.
३) वाहतुकीसाठी वापरलेली जुनी वापरती काळया रंगाची हिरो मायस्ट्रो मोपेड क्रं. MH 34 BL 3591 कि.अं.३५,०००/-रु. असा एकुण- ६७, ९००/-रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.असून
आरोपी नामे-१) पवन लालु घुगलोत वय-२२ वर्षे, धंदा-मजुरी २) लालु पंतलु घूगलोत वय-५२ वर्षे दोन्ही रा. शिवनगर वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन पोलीस ठाणे बल्लारपुर येथे गुन्हा रजि.क्रं.३२५/२०२४ कलम ६५ (अ), ८३ महा. दा. का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

==========================

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु सा, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांचे मार्गदर्शनात पो.नि. आसिफराजा बी. शेख, स.पो.नि. दिपक कांक्रेडवार, पोहवा. संतोष दंडेवार, पो.अं. गणेश पुरडकर यांनी केली आहे.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here