=========================
नागभीड (वि.प्र.)
=========================
‘पोलीस’ हा शब्दएकला की समोर उभी राहते ती पोलिसांबद्दल नकारात्मक प्रतिमा, असंवेदनशीलपणा, पाषाणहृदयी असणारे पोलीस’च अशीच एक मानसिकता सर्वसामान्यांची असेल,पण त्यांनाही संवेदन शील मन असते ही वास्तविकता प्रत्यक्षरीत्या परिसरात वारंवार अनुभवायला येत आहे. पोलिस हा सुद्धा माणूसच आहे याचा अनुभव अनेक वेळा येतो.रस्त्यावर असललेल्या इसमाला रात्री घरी सुखरूप पोहचविल्याने यातून त्यांचे माणुसकिचे दर्शन दिसून आले. व त्यांच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम! तळोधी बा. पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर असलेले पीएसआय लांबट व मानकर हे दोन पी. एस. आय. रात्रो ८. वाजता कर्तव्यावर सावरगाव, चिखलगाव, गिरगाव वरून कर्तव्य बजावून येत असताना तळोधी वलनी महाराष्ट्र पोलीसानी सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य सार्थक केले.असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही गस्त दरम्यान दोनचाकी वर एक व्यक्ती रस्त्याचे कडेला रात्री ११ वाजता उभा होता. तो जवळपास २ ते ३ तासापासून होता. त्याचा हेल्मेट गाडीचे खाली पडलेला होता. तीन तासापासून त्याला मुख्य रोडवर राहूनही कोणीही साधी विचारपूस करण्याचे सौजन्य ही दाखविले नाही. परंतु लांबट व मानकर हे अधीकारी कर्तव्य बजावून जात असताना तो व्यक्ती त्याच स्थीतीत त्या ठिकाणीं असल्याचे दिसून आले. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना शंका आली की आम्ही दोन तासानंतर
ही हि दुचाकी रोडवर कशी काय म्हणून दोन्ही पी.एस.आय. व
ठाणेदार अजितसिंह देवरे हे स्वतः गाडी घेऊन आले व चौकशी केली तर तो व्यक्ती आपल्या दुचाकी गाडीवरच डोका ठेऊन होता. तेव्हा त्यांनी त्याची चौकशी केली असता त्याचा तोल सांभाळत नसल्याने तो तिथेच गाडी उभी करून गाडीवरच डोका ठेऊन होता हेल्मेटसह सामानही अस्ता- व्यस्त होता. तेव्हा त्यांनी त्याला पोलीस स्टेशन येथे आणून चौकशी केली तर तो व्यक्ती चिमूर येथील असल्याचे समजले असता त्यांच्या कुटुंबाला निरोप देऊन बोलवण्यात आले व त्या व्यक्तीस त्यांचे स्वाधीन केले.
============================
तळोधी बा. पोलीस स्टेशन चे नव्यानेच आलेले दोन पी.एस. आय. लांबट व मानकर व ठाणेदार अजितसिह देवरे यांनी माणुसकीचे दर्शन देत त्या व्यक्तीस रात्रीच घरी पोहचविण्यास मदत केली.ही बातमी पसरताच संपूर्ण जिल्ह्यातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.हे मात्र विशेष!
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,