=========================
*चंद्रपूर*
===========================
दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी मौजा मोरया चंद्रपुर येथे मा. ना. श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा कार्यक्र आयोजित करण्यात आलेला आहे. सदर सभे करीता नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये मी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर सदर मार्गावर वाहतुक सुरळीत चालावी, वाहतुकीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणुन अधिसुचना निर्गमीत करीत आहे.
=========================
दिनांक ०७/०४/२०२४ रोजी दुपारी १४:०० वा. ते दि.०८/०४/२०२४ वे रात्रौ २०:०० वा. पर्यंत मोरवा विमानतळ पासुन ते मोरवा टी पॉईट पडोली चौक वरोरा नाकापर्यंत tv झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. तरी सदर मार्गावर कोणत्याही नागरीकांनी वाहने पाकींग करू नये. तसेच या मार्गावर कोणीही दुकाने / हातठेले लावु नये.
==========================
नागरीकांनी सदर अधिसुवनेचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,