*कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी चंद्रपूर शहर पोलीसांचे शहरात रुट मार्च*

0
46

==========================

          *चंद्रपूर*

==========================
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ तसेच येणारे सण उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच सर्व सण उत्सव, लोकसभा निवडणुक प्रक्रिया शांतते पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर अंतर्गत दिनांक ९ एप्रिल, २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांचे उपस्थितीत पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर पोलीसांचा माता महाकाली जवळील मतदान केंद्र क्रमांक १७५, १७६ चे इमारत येथुन रुट मार्च काढण्यात आला.

===========================

सदर रुट मार्च चंद्रपूर शहरातील माता महाकाली मंदीर गुरुद्वारा साहेबसिंग सभा अंचलेश्वर गेट शिवाजी चौक दस्तगीर चौक गांधी चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जयंत टॉकीज चौक ते जटपुरा गेट या मार्गाने जटपुरा गेट बाहेरील महात्मा गांधी पुतळयाजवळ समाप्त करण्यात आला आहे.

===========================

सदर रुट मार्च करीता चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी श्री विनय गौडा, पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन मुम्मका, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या समवेत पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर श्रीमती प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक रामनगर श्री सुनिल गाडे यांचेसह १३ पोलीस अधिकारी पो. स्टे चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापूर, पडोली, घुग्घुस येथील ४९ पोलीस अंमलदार, सी-६० कमांडो पथकाचे ३८ पोलीस अंमलदार, दंगा नियंत्रण पथकाचे ३० पोलीस अंमलदार तसेच सीआयएसफ कंपनीचे कंमाडर श्री ताकसांडे व ५४ जवान हजर होते,

=============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here