आमदार किशोर जोरगेवार यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

0
28

======================

  *चंद्रपूर* 

=======================

रमजान ईद निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी लष्कर ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे जावून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी अनवर खान, साबिर सर, अनवर अली, जहिर काजी, इजहार काजी, अफिसुर रहमान, पोलिस उपाविभागीय पोलिस अधिकारी सुधारकर यादव, शांतता समितीचे रमजान अली घायल, खत्री,रामनगर चे पोलिस निरिक्षक घोडे, यंग चांदा ब्रिगेडचे अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सलिम शेख, युथ अध्यक्ष राशेद हुसेन, इमरान शेख, सय्यद अबरार, व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती.
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आज संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. चंद्रपूरमध्ये सुद्धा ईद उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातील लष्कर ईदगाह आणि शाही गुप्त मस्जिद येथे मस्जिद कमेटीच्या वतीने नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी येथे उपस्थिती दर्शवत ईदगाहमध्ये येणा-या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात. रमजान हा मुस्लिम धर्मातील पवित्र महिना असून ईश्वराची आराधना करत असताना आपले सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण हा सण आपल्याला देतो. सामाजिक सलोखा आणि बांधिलकी शिकविणारा हा सन असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here