===========================
*चंद्रपूर*
============================
चंद्रपूर/दि. ११ एप्रिल २०२४ : देशाचे कर्तृत्ववान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत देशाची प्रगती होत आहे. देश विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना काँग्रेसचे पंक्चर चाक मोदींच्या विकास गाडीला लावू नका, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे पंक्चर झालेले चाक आता पाच वर्ष दुरुस्त होऊच शकत नाही, अशी जोरदार टीका करीत चंद्रपूर-आर्णी-वणी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा , शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. ===============================
चंद्रपूर शहरातील पठाणपुरा बाबू पेठ आणि बंगाली कॅम्प येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ नुकतीच जाहीर सभा पार पडली. या सभेला ते मार्गदर्शन करताना बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा लोकसभा निवडणूक असतो हा उत्सव आता जवळ आलेला आहे. या उत्सवात मागील वर्षी केलेली चूक यावर्षी होऊ नये याची प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे. मागील साडेचार वर्षात या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास खुंटला आहे त्यामुळे आता आपण सर्वांनी विकासासाठी मतदान करा असे आवाहन मी करतो. चंद्रपूरकरांनी जेव्हा जेव्हा मला विकास काम करण्याची संधी दिली तेव्हा तेव्हा मी तुमच्या सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलो आहे, हे तुम्हाला माझ्या मतदार संघात केलेल्या विकासकामांवरून दिसून येते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कुठलेही गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणात गरिबी आडवी येणार नाही. यासाठी ६०० कोटी रुपये खर्च करून आपण एसएनडीटी युनिव्हर्सिटीची निर्मिती करीत आहोत. त्यामध्ये ६२ नवीन कोर्सेस सुरू होतील त्याचा या क्षेत्रातील गरीब कुटुंबातील मुलींना त्याचा फायदा होईल याचा मला विश्वास आहे.
===========================