*क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण करून आमदार किशोर जोरगेवार यांनी केले अभिवादन*

0
19

======================== 

  *चंद्रपूर*

========================

संपूर्ण जिवन शिक्षण गंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी खर्ची घालणा-या क्रांतिसूर्य, ज्ञानदाता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी मौलाना अबुल कलाम बागेतील महात्मा ज्यातिबा फुले यांच्या स्मारकास माल्यार्पण करत अभिवादन केले.

==========================

यावेळी माळी महासंघाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष विजय चहारे, माळी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजू बनकर, माजी नगर सेवक नंदु नागरकर, विश्वास बनकर, मधुकर जथाडे, सरदेव इंगोले, कालिदास वाडगुरे, अशोक खडके, बबनराव वानखेडे, विजय राऊत, सचिन निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी भारतीय समाजसुधारक होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांना आपले गुरु मानत. गांधीजींनी त्यांना महात्मा म्हणून संबोधले. गुलामगिरी विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्यांनी गुलामगिरी विरुद्ध सतत लढा सुरू ठेवला होता. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी तळागाळातील  समाजासाठी शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. स्त्री ला औषधालाही स्वातंत्र्य न देणा-या समाजात त्यांनी आपली अर्धांगिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मुलींच्या शिक्षणाचा भरभक्कम पाया रचला. त्यांनी समाजासाठी दिलेले विचार हे समाजासाठी अमूल्य भेट असून त्यांचे विचार अंगी सारण्याची आज गरज असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here