*रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे– डॉक्टर सुहास वझे डॉ सुहास विनायक वझे यांना वरोरारत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान*

0
19

=========================

वरोरा दिनांक 11 एप्रिल
वरोरा तालुक्याच्या परिसरातील असंख्य मातांचे प्रेम मला आयुष्यभर मिळाले. त्यामुळे मी यशस्वीरित्या दहा हजाराच्या वर नॉर्मल प्रसुती करू शकले. विशेष म्हणजे या चार दशकांच्या काळात एकही महिला किंवा बाळ दगावले नाही आणि कुणीही अनाथ झाले नाही याचे समाधान आहे. कुटुंबीयांचे प्रेम आणि रुग्णांचे आशीर्वाद यामुळेच हे शक्य झाल्याचे प्रतिपादन वरोरारत्न जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ सुहास वझे केले. गांधी उद्यान योग मंडळ आणि गुढीपाडवा आयोजन समितीच्या वतीने आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

=========================

यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक प्रकाश मुथा, ग्यानचंद मालू, श्रीनिवास शिंदे मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रा धनराज आस्वले, योगाचार्य प्रकाश संचेती, गांधी उद्यान योग मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नेमाडे आणि गुढीपाडवा आयोजन समितीचे अध्यक्ष नितेश जयस्वाल यांची उपस्थिती होती,

==========================

गांधी उद्यान योग मंडळ आणि गुढीपाडवा आयोजन समितीच्या वतीने मागील सात वर्षापासून हिंदू नववर्ष गुढीपाडव्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मंगळवार ला आयोजित या भव्य सोहळ्याची सुरुवात सकाळी 7.30 वाजता वरोरा शहरातून रणरागिनींची बाईक रॅली काढून करण्यात आली . त्यानंतर लगेच ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून निघाली. यावेळी बैलबंडीवर उभारलेली पारंपरिक गुढी हे विशेष आकर्षण होते. विविध सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या वतीने यावेळी सरबत आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली होती.
सायंकाळी 7 वाजता आंबेडकर चौक येथे परिमल जोशी व संच,नागपूर यांनी बहारदार संगीत मैफल सादर केली. यावेळी वरोरा रत्न जीवन गौरव पुरस्कार वरोऱ्याच्या माऊली प्रसिद्ध प्रसुतीतज्ञ डॉ सुहास विनायक वझे यांना प्रदान केला गेला.
गांधी उद्यान योग मंडळाच्या वतीने स्वर्गरथ, ॲम्बुलन्स सेवा, ऑक्सीजन ब्रिगेड आदी सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी स्व.डॉ विनायक वझे स्मृतिप्रित्यर्थ डॉ सागर वझे यांनी दिलेल्या आर्थो बँक चे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले.
शहराच्या माध्यभागी असेलेल्या गांधीसागर तलावाच्या वाल्मिकी प्रवेशद्वारावर केलेली रोषणाई लक्षवेधक होती. प्रा धनराज आस्वले यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. बँकॉक येथे आयोजित योगासन स्पर्धेत सुवर्णपदके मिळवणाऱ्या योगपटूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. अजय नरडे, गोपाल कातोरे आणि शाम टोकसिया या दांपत्यांना त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा राधा सवाने यांनी मानपत्राचे वाचन केले. आनंद गुंडावार यांनी प्रास्ताविक तर डॉक्टर प्रशांत खुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नरेंद्र नेमाडे यांनी आभार व्यक्त केले. वरोरेकरांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमांना होती.
मनोज कोहळे , प्रमोद गिलोरकर प्रविन सुराना, सुनील बांगडे ,गणपत भडगरे, पवन मालू, योगेश डोंगरवार, शुक्ला बंधू,खेमराज कुरेकार,अमित नहार आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता अथक परिश्रम घेतले.

========================
डॉ सुहास विनायक वझे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मान्यवर 

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here