===========================
चंद्रपूर पोलीस*
==========================
Email: sp.chandrapur@mahapolice.gov.in :07172-264300,: 07172-255800 : 7447744100 (PRO)
========================
दिनांक 14 एप्रिल, 2024
========================
असे कृत्य करणाऱ्यावर चंद्रपूरात गुन्हा दाखल – सोशल मिडीयावर चंद्रपूर पोलीसांची करडी नजर
============================
सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुक २०२४ आदर्श आचार संहिता सुरु आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकिय पक्षातील उमेदवार निवडणुकी करीता उभे असुन प्रचार सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया WhatsApp, Facebook, Twitter@x ईत्यादि समाज माध्यमावर विविध प्रकारच्या ऑडीओ/व्हिडीओ व संदेश टाकण्यात येतात, तसेच अश्या पोष्टवर इतर लोक लाईक व कॉमेन्टस् करुन शेअर करतात.परंतु असे निदर्शनास आले आहे की, खोट्या बातम्या प्रसारीत करणारे
ऑडीओ/व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे. तसेच काही इसम व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने प्रतिपक्ष उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटूंबियांना लक्ष करुन द्विअर्थी आक्षेपार्ह पोष्ट टाकत आहेत, व अश्या पोष्ट ला इतर इसम लाईक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करुन शेअर करीत आहे. यावरुन नुकतेच आदर्श आचार संहिता दरम्यान समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोष्टमुळे समाजात तेढ निर्माण करुन शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधीत इसमाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात येवुन त्यास अटक करण्यात आलेली आहे. तरी, या द्वारे सर्व नागरीकांना सुचीत करण्यात येते की, आपण आपले
WhatsApp, Facebook, Twitter@x व इतर सोशल मिडीयावर राजकीय पक्ष व उमेदवार बाबत वैयक्तिक व आक्षेपार्ह टिपा टिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोष्ट टाकु नयेत. कोणतेही व्हिडीओ, फोटो एडीट करुन आक्षेपार्ह भासवुन पोष्ट करु नयेत, किंवा त्यास लाईक व कॉमेन्टस् करुन अश्या प्रकारच्या पोष्ट शेअर करु नयेत. सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातून पोष्ट करतांना सामाजिक भान ठेवण्यात यावी. अन्यथा संबंधीतांविरुध्द प्रचलीत कायद्यान्वये कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.
अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ/ऑडीओ, संदेश प्राप्त झाल्यास त्या-त्या समाज माध्यमावर रिपोर्ट करावे. किंवा त्याची माहिती त्वरीत नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील मोबाईल क्रमांक 8888511911 या कमांकावर देण्यात यावी।सोशल मिडीयावरील पोष्ट वर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाचे सोशल मिडीयाची करडी नजर ठेवून आहेत. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =======≠=================== संपादक :- शशि ठक्कर , 9881277793, उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,