=========================== *चंद्रपूर* =========================== दिनांक १४/०४/२०२४ रोजी फिर्यादी (काल्पनीक नाव) रा. रामनगर, चंद्रपूर यांनी पोस्टला तकार दिली की, यातील फियाँदी ही दिनांक १३/०४/२०२४ रोजी सायंकाळी ५:०० वाजता दरम्यान सिंदी कॉलनी, दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे ए.टि.एम. मध्ये पैसे काढण्याकरीता गेली असता, कोणी तरी अज्ञात इसमाने ए.टि.एम. चे मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन लक्ष विचलीत करून ५,०००/- रूपये चोरून नेले अशा फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क. ४०१/२०२४ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. ============================== नमुद गुन्हयाचे गांभीर्य तसेच चंद्रपुर शहरात वाढता ए.टि.एम. मशिन मधील पैसे चोरी करण्याचे प्रयत्न बघता मा. पोलीस अधिक्षक सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वयें वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल गाडे, पोलीस स्टेशन, रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक, रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी रवाना होवुन घटनास्थळाचे आजुबाजुच्या परिसरातील सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक करून गोपनिय वातमिदाराचे माहीती वरून अतिशय परिश्रम घेवुन तांत्रिक पध्दतीने कौशल्यापुर्ण तपास करून आरोपी नामे कार्तीक शंकर मामीडवार वय २७ वर्ष रा. लालपेठ कॉलरी, बाबुपेठ रेल्वे स्टेशन जवळ चंद्रपूर तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन गुन्हयातील फिर्यादी हिचे चोरून नेलेले पैसे जप्त करण्यात आले. =========================== नमुद गुन्हयातील आरोपी तसेच विधी संघर्षग्रस्त बालकांना अधिक विचारपुस केले असता त्यांनी यापूर्वी चंद्रपुर शहरात अंदाजे ५-७ ठिकाणी ए.टि.एम. मशिनला सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच बल्लारशाह येथे सुध्दा पेपर मिलचे समोरील ए.टि.एम. मधुन पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केले असे तपासात निष्पन्न झाले आहे. ============================ पोस्टे रामनगर अप.क. अप.क. ४०१/२०२४ कलम ३७९ भादंवि सिध्दी कॉलनी, दुर्गा माता मंदिर समोरील कॅनरा बँकेचे, घटनास्थळ ए.टि.एम. चंद्रपुर आरोपीचे नाव कार्तिक शंकर मामीडवार बाबूपेठ रेल्वे स्टेशन , वय २७ वर्ष रा. लालपेठ कोलियरी जवळ चंद्रपूर तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालक जप्त माल नगदी ५,०००/- रूपय चंद्रपुर शहर तसेच जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, ए.टि.एम. मशिन मधिल पैसे निघण्याचे ठिकाणी सिल्वर रंगाची पट्टी लावुन पैसे अडकल्याचे भासवुन थोडया वेळानी सिल्वर रंगाची पट्टी काढुन पैसे चोरी करणारी टोळी सकीय झाली असल्याने सर्व नागरीकांनी सतर्क राहनयचे आवाहन पोलीस प्रशासना द्वारे करण्यात येत आहे। ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793, वर्कशॉप नंबर,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,