महात्मा बसवेश्वेर महाराज व भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त निघालेल्या रॅलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

0
41

==========================                *चंद्रपूर* 

=======================

    महात्मा बसवेश्वेर महाराज व भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅली व शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.
क्रांतिसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती लिंगायत समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातुन बाईक रॅली काढण्यात आली होती. तर भगवान परशुराम यांची जयंती ही ब्राम्हण समाजाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या वतीनेही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजता सदर शोभायात्रा गांधी चौकात पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. तर क्रांतिसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेचेही गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले.
=============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
==============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here