=============================
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केली टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची पाहणी
===========================
१५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश
===========================
पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मानस
============================
चंद्रपूर, दि. २८ : चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि.२७) पाहणी केली. अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असे १४० खाटांच्या हॉस्पीटलचे ८० टक्के कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित वीस टक्के काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
=============================
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पीटलमधील बांधकामाचा आढावा घेतला तसेच काही सूचना देखील केल्या. या सूचनांवर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समिती देखील नेमण्याचे त्यांनी निर्देश दिले. बांधकामाचा पाठपुरावा करून येत्या १५ ऑगस्टपर्यंत हॉस्पीटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व्हावे यादृष्टीने देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी समितीकडे असणार आहे. १५ ऑगस्ट अथवा त्या लगतच्या तारखेला देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि श्री. रतनजी टाटा यांच्या विशेष उपस्थितीत टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा मानस ना.श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
============================
याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, भाजपा नेते नामदेव डाहुले, डॉ.मंगेश गुलवाडे, धनराज कोवे, कमिशनिंग अँड इम्प्लिमेंटेशन प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक श्री. वैभव गौतम, प्रकल्प समन्वयक श्रवण येगिनवार, वित्त आणि लेखा व्यवस्थापक मयूर नंधा, एमईपी व्यवस्थापक राकेश नायक, पीएमसी प्रमुख हाफीज शेख आदींची उपस्थिती होती.
==============================
टाटा समुहाचे सर्वेसर्वा श्री. रतन टाटा यांच्याद्वारे २०१६ मध्ये बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरकरिता सहकार्य लाभले यादरम्यान पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे मतदारसंघ वाराणसी येथे टाटा कॅन्सर हॉस्पीटल बांधण्याची घोषणा झाली होती. यानंतर ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. रतन टाटांना चंद्रपुरमध्येही टाटा कॅन्सर हॉस्पीटल तयार व्हावे, यासाठी विनंती केली होती. श्री. टाटा यांनी त्यासाठी देखील पुढाकार घेत कॅन्सर हॉस्पीटलकरिता १०० कोटी रुपयांचा सीएसआर निधी देण्याचे कबूल केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे आता चंद्रपूरमध्ये १४० खाटांचे टाटा कॅन्सर हॉस्पीटल तयार होत आहे. याकरिता राज्य शासन आणि टाटा कॅन्सर हॉस्पीटल असे संयुक्त ट्रस्ट निर्माण करण्यात आले आहे. हॉस्पीटलचे ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. कोवीड काळात २ वर्षे ८ महिने भारतीय जनता पार्टीचे सरकार नसल्यामुळे या कामाची गती अतिशय मंद झाली होती. पण आता कामाला गती मिळालेली असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. कॅन्सर हॉस्पिटल २लाख ३४ हजार १४ स्केअर फुटात वसलेले आहे.चंद्रपूरचे १४० खाटांची क्षमता असलेले टाटा कॅन्सर हॉस्पीटल अतिशय अत्याधुनिक असून यामध्ये उत्तम सेवा उपलब्ध आहेत. या हॉस्पीटलचा उपयोग हा तेलंगाणा, छत्तीसगढ व महाराष्ट्राच्या मध्य भागातील कॅन्सर रुग्णांना निश्चितपणे वरदाण ठरणार आहे, असा विश्वास ना.श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
===========================
मा.ना.सुधीर मुनगंटीवार यांनी टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या यावेळी संपूर्ण कामासंदर्भात आढावा घेतला .हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या बांधकामासंदर्भात यंत्रणेची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. याशिवाय हॉस्पीटलच्या पोच मार्गावरील अतिक्रमण काढणे, पथदिव्यांची व्यवस्था अद्ययावत करणे, नवे पथदिवे लावणे, सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता साफ करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि टाटा कॅन्सर हॉस्पीटलकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठे दिशादर्शक फलक लावणे, हॉस्पीटलच्या आवारात अद्ययावत कॅन्टीन,सोलर,मेडिकल, पार्कींग, एटीएम आदींची सर्व सुविधा करणे, परिसरात नेहमी स्वच्छता, पिण्याचे पाणी यादृष्टीने नियोजन करणे, परिसरात पर्यावरणाच्या दृष्टीने वड,पिंपळ,कडूनिंब,औदुंबर,देशी आंबा,गुलमोहर आदी झाडांचे
वृक्षलागवड करणे आदींबाबत देखील ना.श्री. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,