==============================
*गडचिरोली*
===============================
गडचिरोली :: जिल्ह्यातील वारंवार रानटी हत्तीचे आगमन आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हावालदिल झाला असून, रानटी हत्तीच्या हल्ल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी सोबतच रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराची नुकसान झाली असून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून हमीभावाप्रमाणे सुरु करण्यात यावी यासह गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक भागात हलक्या पावसानेही पाणी जमा होऊन त्याठिकाणी नागरिकांना ये जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागतो अश्या रस्त्यावर रस्ते वाहतूक विभागामार्फत मान्सून पूर्व दुरुस्ती करण्यात यावी अश्या, विविध समस्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.यावेळी जिल्हाउपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली नेताजी गावतुरे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, अध्यक्ष सोशल मिडिया संजय चंनेभ, नदीम नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येनप्रेड्डीवार, घनश्याम मुरवतकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,