*दीपक जयस्वाल यांनी गोरगरिबांना एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला.*

0
34

============================                   

चंद्रपूर(वि.प्र.):चंद्रपूर येथे मागील आठवड्यापासून सततधार पावसामुळे अनेक गोरगरिबांचे परिवार उघड्यावर आले असून अशा गोरगरिबांना एक हात मदतीचा म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी पुढाकार घेत अनेक गरीब गरजूंना अन्नधान्य किट ताटपत्री व शालेय पुस्तके वितरित केले त्यामुळे त्यांनी केलेल्या या कार्याचे बुद्धिजीवी वर्गाकडून कौतुक केले जात आहे हे मात्र विशेष!

चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चंद्रपूर चे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल व राणी मनजीतसिंग भाटिया यांच्या संयुक्त विद्यमाने हे मदत कार्य संपन्न झाले.

चंद्रपूर येथील अंचलेश्वर गेट लगत झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब गरजू कुटुंबियांना एक हात मदतीचा म्हणून गोरगरिबांना अन्नधान्य किट ताडपत्री व विद्यार्थी मुलींना शालेय पुस्तके भेट देऊन त्यांना अति मोलाचे सहकार्य केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे, महिला अध्यक्ष बेबीताई उईके,सुहास पिंगे, परब गिरटकर, सरस्वती गावंडे,सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.                                                                                 *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,वगढ़ चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे*
*संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356*
*उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here