तयार होणार असलेले योग भवन समाजाच्या उन्नतीचे, एकतेचे, आणि आरोग्याचे प्रतीक ठरावे – आ. किशोर जोरगेवार

0
10

================================

तुकूम येथील योग भवनाचे भूमिपूजन

================================

योगाध्यानआणि आरोग्याचे महत्त्व आपणा सर्वांना माहीत आहे. आरोग्य हा आपल्या जीवनाचा मूलमंत्र आहेआणि या या योगा भवनाच्या माध्यमातून आपण आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यसंपन्न जीवन मिळवावे. हे भवन केवळ योगाभ्यासाचे स्थान राहणार नाहीतर आरोग्य आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तयार होणार असलेले योग भवन समाजाच्या उन्नतीचेएकतेचेआणि आरोग्याचे प्रतीक ठरावे  असे  प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

आमदार निधीतून तुकूम येथील योग भवनाच्या बांधकामासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी २५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. वासुदेव गाडेगोणेमाजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवाररमेश भुतेअजय वैरागडेउमेश आष्टनकरवीणा खेडेकरखंगार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.                                                               

 यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीमागील पाच वर्षांत मतदारसंघात मोठी विकासकामे करता आलीयाचा आनंद आहे. अनेक मोठी कामे आपण या पाच वर्षांत मार्गी लावू शकलो. यात घुग्घूस आणि बाबूपेठ उड्डाणपूल पूर्णत्वास जात आहे. तर पवित्र दीक्षाभूमी येथे आपण जवळपास ५७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मतदारसंघातील विविध भागात ११ अभ्यासिकांचे काम सुरू आहे. अनेक समाजभवने उभी झाली आहेतअसे ते यावेळी म्हणाले.

 योगाविषयी मोठी जनजागृती झाली आहे. प्रत्येक वार्डात योगा ग्रुप सक्रिय काम करत आहे. आपणही प्रत्येक योगा ग्रुप पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून त्यांना शक्य ती मदत करत आहोत. शहारात ११ योगा शेड तयार करण्याचा संकल्प आपण केला आहे. यातील काही योगा शेडचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि या भवनाच्या माध्यमातून एकत्र येऊन आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन करण्याचा संकल्प करा. असे आवाहन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here